Onion Subsidy : पीकपेरा अट शिथिल केल्याने कांदा उत्पादकांना फायदा

Onion Market : त्यामुळे अपात्र झालेल्या आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यांतील २ हजार ८७८ कांदा उत्पादकांना एकूण आठ कोटी १८ लाख रुपये अनुदान मिळेल.
Onion
Onionagrowon

Pune News : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदानासाठी उन्हाळी पीक पेरण्यांची नोंद आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या अर्जाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा सूचना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमिरे यांच्याशी चर्चा करून दिल्या आहेत.

त्यामुळे अपात्र झालेल्या आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यांतील २ हजार ८७८ कांदा उत्पादकांना एकूण आठ कोटी १८ लाख रुपये अनुदान मिळेल. त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

Onion
Onion Subsidy : कांदा अनुदानावरून विरोधकांनी आवाज उठवताच, अब्दुल सत्तारांनी केली मोठी घोषणा

पुणे येथे शासकीय विश्रामगृहात शनिवारी (ता. २२) वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, जिल्हा विशेष लेखापरीक्षक डी. एन. काळे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, संचालक नीलेश थोरात, सोमनाथ काळे, अरुण बांगर, संदीप चपटे व बाजार समितीचे सचिव सचिन बोऱ्हाडे उपस्थित होते.

Onion
Onion Subsidy : कांदा अनुदानाचे ४० हजारांवर अर्ज अपात्र

“मंचर व लोणी येथे बाजार समितीच्या आवारात विक्री केलेल्या कांदा अनुदानासाठी पाच हजार ३६ अर्ज प्राप्त झाले होते. अर्जांची तपासणी केल्यानंतर दोन हजार १५८ अर्ज पात्र झाले आहेत. त्यांना आठ कोटी २१ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. पण उन्हाळी पीक पेरण्यांची नोंद असल्याने दोन हजार ८७८ कांदा उत्पादकांचे अर्ज अपात्र ठरले होते.

अडचणीतील कांदा उत्पादकांना अनुदान देऊन न्याय द्यावा,” अशी मागणी सचिन पानसरे व नीलेश थोरात यांच्यासह संचालक मंडळाने केली होती. या वेळी झालेल्या चर्चेत जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता बगाटे यांनी भाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com