Grape Export : सात हजार शेतकऱ्यांची द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी

सांगली ः जिल्ह्यातून सातासमुद्रापार द्राक्षाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७ हजार २१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
Grape Export
Grape ExportAgrowon

सांगली ः जिल्ह्यातून सातासमुद्रापार द्राक्षाची निर्यात (Grape Export) करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी पुढाकार घेतला आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ७ हजार २१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा १६ हजार शेतकरी नोंदणीचे लक्ष्यांक कृषी विभागाने (Agriculture Department) निश्चित केले असून गतवर्षीपेक्षा यंदा नोंदणी अधिक होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

जिल्ह्यातून द्राक्षाची युरोपियन देशासह अन्य देशांत निर्यात केली जाते. दरवर्षी निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात ऑक्टोबरअखरे पाऊस असल्याने निर्यातक्षम द्राक्षांची छाटणीही उशीराच सुरू झाली आहे; मात्र, अशातही शेतकऱ्यांनी द्राक्षाची निर्यात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात गतवर्षी ५ हजार ९४७ शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली असून सर्वच शेतकऱ्यांनी द्राक्षाची निर्यात केली होती. तासगाव तालुक्यातून सर्वाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

Grape Export
Grape Disease Management : द्राक्ष बागेतील डाऊनी, भुरी व्यवस्थापन कसे करावे?

गेल्या दोन वर्षांपासून द्राक्षाची निर्यात वाढावी, यासाठी कृषी विभाग पुढाकार घेत आहे. यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात करण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. द्राक्ष निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये कृषी विभागाने जनजागृती केली आहे. त्यामुळे १६ हजार शेतकरी नोंदणी करतील, असे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत ७ हजार २१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी २ हजार ४३८ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली आहे. तर ४ हजार ७६३ शेतकऱ्यांनी नूतनीकरण केले आहे.

Grape Export
Grape Crop Damage : माथेफिरूकडून ऐन हंगामात द्राक्ष बागेचे नुकसान

जत तालुक्यातील शेतकरी द्राक्ष निर्यातीसाठी पुढे येत असल्याचे चित्र आहे. जत तालुक्यातील १ हजार १७ शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली असून ८४८ शेतकऱ्यांनी नूतनीकरण अशा १ हजार ८६५ शेतकऱ्यांनी आतापर्यंत द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी केली आहे. अर्थात तासगाव तालुक्याला नोंदणीत मागे टाकले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालातील आकड्यावरून स्पष्ट होत आहे.

तालुकानिहाय द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी

तालुका नवीन नूतनीकरण एकूण संख्या

आटपाडी ५३ ५४ १०७

जत १०१७ ८४८ १८६५

कडेगाव ३३ ३९ ७२

कवठे महांकाळ २९९ ४८८ ७८७

खानापूर १२१ १०८८ १२०२

मिरज ८३० २६७ १०९७

पलूस ३ ३७२ ३७५

तासगाव ८२ १४८७ १५६९

वाळवा ०० १२० १२०

एकूण २४३८ ४७६३ ७०२१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com