Grape Disease Management : द्राक्ष बागेतील डाऊनी, भुरी व्यवस्थापन कसे करावे?

सद्यःस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणच्या द्राक्ष उत्पादक भागांमध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती दिसून येत आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडल्याची स्थिती आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानातही चढ-उतार जाणवत आहे.
Grape Disease
Grape DiseaseAgrowon

डॉ. सुजॉय साहा, डॉ. रत्ना ठोसर, स्नेहा भोसले

सद्यःस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणच्या द्राक्ष उत्पादक (Grape Producer Belt) भागांमध्ये ढगाळ वातावरणाची (Cloudy Weather) स्थिती दिसून येत आहे. तर काही ठिकाणी पाऊस पडल्याची स्थिती आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानातही चढ-उतार जाणवत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण व संध्याकाळी थंडी अशी हवामान स्थिती जाणवत आहे. अशा बदलत्या वातावरणामध्ये आर्द्रता, तापमान आणि ढगाळ या अनुकूल हवामान घटकांमुळे रोगांचा प्रादुर्भाव (Grape Disease) वाढण्याची दाट शक्यता आहे.

Grape Disease
Grape Season : द्राक्ष हंगामाचे गणित वातावरणावर अवलंबून

सध्या बऱ्याच बागा फुलोरा किंवा दोडा अवस्थेत आहेत. रोगनियंत्रणाच्या दृष्टीने ही द्राक्षातील अतिशय जोखमीची अवस्था आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी वनस्पती वाढ नियंत्रके (पीजीआर) देण्याची कामे सुरू आहेत. यामुळे द्राक्ष बागेत आर्द्रतेचे प्रमाण वाढून डाऊनीचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता होते.

Grape Disease
Grapes Crop : द्राक्षाला बदलत्या वातावरणा धोका

सकाळच्या वेळी दव पडत असलेल्या ठिकाणी द्राक्ष घडांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव वाढून फळकुज होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ८० ते ९० टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणामध्ये डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. परंतु सध्याच्या अनुकूल परिस्थितीमध्ये नियंत्रणात आलेला डाऊनी पुन्हा सक्रिय होऊ शकतो. अशा वेळी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.

Grape Disease
Grape Pomegranate : टॅंकर, शेततळ्यांच्या साथीने फुलल्या द्राक्ष, डाळिंब बागा

डाऊनी नियंत्रण

स्थानिक बाजारपेठेसाठी व मनुक्याचे उत्पादन घेणाऱ्या बागांमध्ये प्रादुर्भाव आढळल्यास, सायझोफॅमिड (३४.५ टक्के) ०.२ मिलि किंवा अमिसालब्रोम (१७.७ टक्के एससी) ०.३७५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

डाऊनीचा प्रादुर्भाव नसलेल्या बागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, डायमेथोमॉर्फ (५० डब्ल्यूपी) ०.५० ते ०.७५ ग्रॅम किंवा इप्रोवॅलीकार्ब अधिक प्रोपिनेब (५.५ अधिक ६१.२५ डब्ल्यूपी) (संयुक्त बुरशीनाशक) २.२५ ग्रॅम किंवा मॅन्डीप्रोपॅमिड (२३.४ टक्के) ०.८ मिलि प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

Grape Disease
Grape Management : ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले

निर्यातक्षम द्राक्षा बागांमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करू नये. त्याऐवजी पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस ४ ग्रॅम किंवा मॅंन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तसेच ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ठिबकमधून नियमित आळवणी सुरू ठेवावी.

घडांमध्ये साचलेले पाणी तार हलवून किंवा ब्लोअरचा वापर करून काढून टाकावे.

भुरी नियंत्रण

काही भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात भुरी रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. काही ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव पानांवर न होता थेट घडांमध्ये होण्याची शक्यता असते. बेरी थिनिंग न झालेल्या बागांमध्ये भुरीचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. कमी पाऊस असलेल्या क्षेत्रांमध्ये किंवा काळ्या द्राक्षांवर किटोसॅनची फवारणी घेतल्यास भुरी नियंत्रणासह मण्यांना तडे जाण्याची समस्या नियंत्रणात राहू शकते.

फळधारणेच्या अवस्थेतील बागांमध्ये प्रादुर्भाव टाळण्यासाठी, सल्फर २ मिलि किंवा ॲपिलोमायसेस क्विसक्वॅलिस ६ ते ८ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी.

अद्यापही फळधारणा न झालेल्या बागांमध्ये, फ्लुओपायरम (२०० एससी) अधिक टेब्युकोनॅझोल (२०० एससी) (संयुक्त बुरशीनाशक) ०.५६३ मिलि किंवा सायफ्लुफेनामीड (५ टक्के ईडब्ल्यू) ०.५ मिलि किंवा फ्लुक्सापायरॉक्साइड ७५ ग्रॅम अधिक डायफेनोकोनॅझोल ५० ग्रॅम प्रतिलिटर (एससी) (संयुक्त बुरशीनाशक) ०.८ मिलि प्रतिलिटर (८०० मिलि प्रति हेक्टर) या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

फळछाटणीनंतर ६० दिवसांपूर्वीची स्थिती असलेल्या बागेत ट्रायझोल वर्गातील हेक्झाकोनॅझोल (५ एससी) १ मिलि किंवा डायफेनोकोनॅझोल ०.७ मिलि किंवा पॉलिऑक्सिन डी झिंक सॉल्ट (५ टक्के एससी) ०.६ प्रति लिटर याप्रमाणे फवारणी घेता येईल.

६० ते ९० दिवसांच्या कालावधीतील बागेमध्ये, सल्फर २ ग्रॅम अधिक कॅल्शिअम क्लोराईड १ ते २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. कॅल्शिअम क्लोराइडच्या फवारणीमुळे मणी क्रॅकिंगची समस्या काही प्रमाणात कमी होईल. मण्यात पाणी उतरल्या नंतरच्या अवस्थेतील बागेत सल्फर २ ग्रॅम अधिक कॅल्शिअम नायट्रेट १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

ॲपिलोमायसेस क्विसक्वॅलिस हे जैविक बुरशीनाशक भुरी विरुद्ध प्रभावी काम करते. त्यामुळे याचा नियमितपणे वापर चालू ठेवावा.

फळधारणेनंतर भुरी रोगाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आल्यास, मेट्राफेनोन (५० टक्के एससी) ०.२५ मिलि प्रति लिटर (२५० मिलि प्रति हेक्टर) या प्रमाणे फवारणी करावी.

फवारणीपूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांच्या संकेतस्थळावरील परिशिष्ट ५ (Annexure ५) नुसार काढणीपूर्व कालावधी अंतर पडताळून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.

दवाचे प्रमाण अधिक असलेल्या बागेत डाऊनी मिल्ड्यू किंवा केवड्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी मॅंन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूपी) ३ ते ५ किलो प्रति एकर या प्रमाणे धुरळणी करावी. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ठिबकमधून नियमितपणे आळवणी सुरू ठेवावी.

निर्यातक्षम द्राक्ष बागांमध्ये फळधारणेनंतरच्या अवस्थेत, सायमोक्सनिल अधिक मॅंन्कोझेब, डायमेथोमॉर्फ, इप्रोव्हॅलीकार्ब अधिक प्रोपिनेब, मॅडीप्रोपामिड या बुरशीनाशकांचा वापर करणे टाळावे.

छाटणीनंतर ९० दिवस पूर्ण झालेल्या बागांमध्ये बॅसिलस सबटिलिसची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करणे फायद्याचे राहील.

बऱ्याच वेळा रोगाची लक्षणे, वनस्पती वाढ नियंत्रकांचे अधिक्य आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे निर्माण होणारी लक्षणे यामध्ये सारखेपणा दिसून येतो. योग्य ओळख पटवून प्रभावी नियंत्रणासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपाययोजना कराव्यात.

- डॉ. सुजॉय साहा, ९४५०३ ९४०५३ (प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com