Horticulture Development : ‘हॉर्टनेट’ प्रणालीवर २३० शेतकऱ्यांची नोंदणी

प्ले स्टोरवर अपेडा फॉर्म नोंदणी अॅप उपलब्ध आहे. या सुविधांचा वापर करून जास्तीत जास्त फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी करण्याकरिता तालुक्यास लक्ष्यांक देण्यात आलेला आहे.
Hortnet Registration
Hortnet RegistrationAgrowon

परभणी ः एकात्मिक फलोत्पादन विकास (Integrated Horticulture Development) अभियान सन २०२२-२३ अंतर्गत परभणी जिल्ह्यात निर्यातक्षम फळे भाजीपाला पिकांच्या (Fruit Export) ट्रेसिबीलीटी नेटद्वारे हॉर्टनेट प्रणालीवर नोंदणीसाठी (Hortnet Registration) ५ हजार ६८९ हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आजवर २३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या (Agricultural Department)) सूत्रांनी दिली.

ट्रॅसिबिलिटीनेटद्वारे शेतकऱ्यांचे नोंदणी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी उपसंचालक यांना समन्वयक अधिकारी प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

प्रत्येक तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व कृषी अधिकारी यांना तपासणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.

यामध्ये मँगोनेट, अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट, बिटल नेट, कांदाकरीता ओनियन नेट, आदरफ्रुटनेट (संत्रा, मोसंबी, लिंबू, खाण्याचे पाण, कांदा व इतर) या पिकांचे ऑनलाइन नोंदणीकरिता अपेडाच्या साइटवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Hortnet Registration
Market Bulletin : दोन वर्षांनंतर अमेरिकेत आंबा, डाळींब निर्यात होणार

प्ले स्टोरवर अपेडा फॉर्म नोंदणी अॅप उपलब्ध आहे. या सुविधांचा वापर करून जास्तीत जास्त फळे व भाजीपाला पिकांची नोंदणी करण्याकरिता तालुक्यास लक्ष्यांक देण्यात आलेला आहे.

लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी गावपातळीवर खास मोहीम राबवून बागांची ऑनलाइन नोंदणीचे निर्देश आहेत.

निर्यातक्षम बागांची नोंदणी करावयाचा कालावधीत निर्धारित करण्यात आलेला त्यात ग्रेपनेट नोंदणी ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३, मँगोनेट नोंदणी डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३, अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट, बिलवानाईन नेट, ओनियननट, आदरफ्रुटनेट वर्षभर सुरु आहे.

तालुकानिहाय उद्दिष्ट...

परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यात ६७५ हेक्टर जिंतूर तालुक्यात ७०० हेक्टर, सेलू तालुक्यात ६१४ हेक्टर, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यांसाठी प्रत्येकी ६१० हेक्टर असे एकूण ५ हजार ६८८ हेक्टरवरील फळे, भाजीपाला पिकांच्या नोंदणीचे उद्दिष्ट आहे.

Hortnet Registration
Agriculture Warehouse : गोदाम उभारणी नोंदणी प्रक्रियेतील टप्पे

फळपीकनिहाय उद्दिष्टात द्राक्षे १२ हेक्टर, आंबा ४२५ हेक्टर, डाळिंब १६९ हेक्टर, भाजीपाला १ हजार ३१ हेक्टर, लिंबू वर्गीय फळपिके (संत्रा, मोसंबी, लिंबू) २ हजार ८६३ हेक्टर,कांदा ४५७ हेक्टर, इतर फळे ७३१ हेक्टर यांचा समावेश आहे.

या अंतर्गत आजवर आंबा ५० शेतकरी, डाळिंब २० शेतकरी, भाजीपाला ५० शेतकरी, लिंबू वर्गीय फळे १०० शेतकरी अशी एकूण २३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

अनेक ठिकाणच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत यंत्रणेकडून या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी दुर्लक्ष्य केले जात असल्यामुळे या अंतर्गत नोंदणीचे उद्दिष्टपूर्ती अद्याप कोसोदूर आहे.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या क्षेत्राची माहिती उपलब्ध नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com