HTBT Cotton : एचटीबीटी कपाशीच्या तस्करीत घट

Cotton Seed Smuggling : एचटीबीटी कपाशी बियाण्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात आतापर्यंत ६२ ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
Cotton Seed
Cotton Seed Agrowon

Pune News : एचटीबीटी कपाशी बियाण्यांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात आतापर्यंत ६२ ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे यंदा तस्करीच्या घटनांमध्ये घट झाल्याचा दावा कृषी आयुक्तालयाने केला आहे.

तणनाशकांना सहनशील असलेले बीटी बियाणे विकण्यास केंद्र व राज्य शासनाची मान्यता दिलेली नाही. त्यामुळे परराज्यांतून या बियाण्यांची तस्करी करून राज्याच्या विविध भागांत विक्री करणाऱ्या टोळ्या अस्तित्वात आलेल्या आहेत.

पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींचा आधार घेत या प्रकरणांमध्ये राज्यभर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणांमध्ये तात्पुरती कारवाई होते.

तस्करीची पाळेमुळे खणून काढण्यात अपयश येत आहे. त्यामुळे एचटीबीटीची तस्करी पूर्णतः थांबलेली नाही. पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Cotton Seed
HTBT Cotton : गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत अवैध ‘एचटीबीटी’चे दलाल सक्रिय

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, कृषी व पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा तस्करीचे प्रमाण घटलेले आहे. पोलिसांनी वेळोवेळी केलेले गुन्हे, थेट दुकानदारांवर झालेल्या कारवाया, शेतकऱ्यांमध्ये एचटीबीटीबाबत झालेले प्रबोधन यामुळे चालू हंगामात तस्करीच्या घटना नियंत्रित करण्यात यश आले आहे.

राज्यात सध्या ४१ ते ४२ लाख हेक्टरच्या आसपास कपाशीची लागवड केली जाते. आता देशी व संकरित लागवड मागे पडली असून, जवळपास ९८ टक्के पेरा बीटी कपाशीचा केला जातो. दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता होण्यात एचटीबीटीच्या तस्करीचा मोठा अडसर असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

राज्यातील कपाशीचा पेरादेखील आता किंचित कमी झालेला आहे. अर्थात, यामागे सोयाबीनकडे असलेला कल कारणीभूत आहे. २०२० मध्ये ४३.८३ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. त्यासाठी २५६ लाखापेक्षा जास्त बीटी बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला होती. विक्री मात्र १६१ लाख पाकिटांची झाली होती.

गेल्या हंगामात राज्यातील शेतकऱ्यांनी ४२.९५ लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा केला व त्यासाठी १६१.४८ लाख बीटी बियाण्यांची पाकिटे विकत घेतली होती. ‘‘मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना मशागतीवरील खर्च परवडत नाही. त्यामुळे ते एचटीबीटीच्या जाळ्यात ओढले जातात.

Cotton Seed
HTBT Cotton : संशयित ‘एचटीबीटी’ कपाशी बियाणे विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

परंतु अनेक भागांत एचटीबीटी सांगून साध्या बीटी बियाण्यांची विक्री केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची आणखी आर्थिक हानी होते. एचटीबीटीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महाभागांची संख्यादेखील मोठी आहे. परंतु अशा प्रकरणांमध्ये तक्रारी करण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

‘एचटीबीटी’ विरोधातील वर्षनिहाय कारवाई

वर्ष–दाखल केलेले गुन्हे–जप्त बियाण्यांचा तपशील- जप्त बियाण्यांची किंमत (लाख रुपयांमध्ये)

२०२१-२४-१७८५४ पाकिटे-२३०

२०२२-२२-३००० पाकिटे व ८८३ किलो सुटे बियाणे-३८

२०२३- १६-३७०० पाकिटे व १४९९० किलो सुटे बियाणे- १७३

एचटीबीटीची तस्करी रोखण्यासाठी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी या हंगामात व्यक्तिशः काही जिल्ह्यांमधील पोलिस प्रमुखांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे तस्करी नियंत्रणात आलीच; परंतु वर्धा तसेच इतर जिल्ह्यांतील तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आले. शेतकऱ्यांनीही यंदा एचटीबीटीकडे पाठ फिरवली.
- विकास पाटील, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com