HTBT Cotton : संशयित ‘एचटीबीटी’ कपाशी बियाणे विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

Cotton Market : मानवत येथील पाळोदी रस्त्यावरील एका कृषी केंद्रावरून बंदी असलेले ‘एचटीबीटी’ कपाशीचे बियाणे विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.
HTBT cotton tests
HTBT cotton testsAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : संशयित एचटीबीटी कपाशी बियाणे पाकिटांची विनापरवाना, अनधिकृतरीत्या साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी मानवत (जि. परभणी) येथील एका कृषी निविष्ठा विक्रेत्या विरुद्ध लातूर विभागीय गुण नियंत्रक व तंत्र अधिकारी प्रवीण भोर यांच्या तक्रारीवरून मानवत पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानवत येथील पाळोदी रस्त्यावरील एका कृषी केंद्रावरून बंदी असलेले ‘एचटीबीटी’ कपाशीचे बियाणे विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती.

त्यानुसार लातूर विभागीय कृषी सह संचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी, गुण नियंत्रक प्रवीण भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक गंगाधर एतलवाड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक किरण सरकटे यांनी मंगळवारी (ता. ३०) मानवत येथील पाळोदी रस्त्यावरील मुक्ताई सेवा केंद्रावर डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली असता संशयित एचटीबीटी बियाण्याची विक्री असल्याचे आढळून आले.

HTBT cotton tests
Cotton Market: शेतकऱ्यांनी लगेच कापूस विकावा असं उद्योगांना का वाटतं?

या प्रकरणी कृषी सेवा केंद्राचे चालक मुक्ताराम बाबूराव रोडे व शेतकरी त्रिंबक प्रल्हाद शेळके यांचा जवाब घेतला. त्यानंतर संशयित एचटीबीटी कपाशी बियाण्याची दोन पाकिटे कृषी विभागाचे ताब्यात घेउन पंचनामा केला.

HTBT cotton tests
Cotton Seed Shortage : देशातील काही भागांमध्ये बीटी कापूस बियाण्याची टंचाई

या बियाणे पाकिटाची निरीक्षण केले असता त्यावर बियाणे कायद्यानुसार त्यावर आवश्यक उत्पादक कंपनीचे नाव, लॉट क्रमांक, वैधता तपासणीची तारीख, किंमत असा कोणताही मजकूर आढळला नाही. त्यांनतर मुक्ताई कृषी सेवा केंद्राचे गोदाम, तसेच दुकानाची तपासणी केली.

संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्याने संशयित एचटीबीटी कपाशी बियाण्याची अनधिकृत साठवणूक व विक्री केल्यामुळे बियाणे कायदा १९६६चे उल्लंघन केले आहे.

महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा वितरण व विक्री किंमत निश्‍चितीकरणचे नियमन) कायदा २००९ च्या मान्यतेचा उल्लेख नसल्याने पर्यावरण संरक्षण कायदा १९८० व आवश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलमचे उल्लंघन केले आहे.

बंदी असलेले संशयित एचटीबीटीचे साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी विक्रेते मुक्ताराम रोडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com