HTBT Cotton
HTBT CottonAgrowon

HTBT Cotton : गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत अवैध ‘एचटीबीटी’चे दलाल सक्रिय

Cotton Seed : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत कापसाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे निरीक्षण आहे.

Gadchiroli News : गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत कापसाखालील क्षेत्रात वाढ होत असल्याचे निरीक्षण आहे. त्याचीच संधी साधत या भागात अवैध एचटीबीटी बियाण्यांची लागवड होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे तेलंगणाच्या सीमेशी संलग्न हे दोन्ही जिल्हे आहेत. त्यामुळेच याच भागातून एचटीबिटीची आयात मोठ्या प्रमाणावर होते.

कापूस शेतीत तणनियंत्रण हे आव्हानात्मक ठरते. तणाला प्रतिकारक तंत्रज्ञान असलेल्या वाणाची लागवड केल्यास अशा क्षेत्रात थेट तणनाशकाची फवारणी करून तणनियंत्रण करता येते. महिको-मोन्सँटोकडून या तंत्रज्ञानाच्या चाचण्या प्राथमिक अवस्थेत घेण्यात आल्या होत्या.

त्यानंतर मात्र पर्यावरणाचा हवाला देत त्या थांबविण्यात आल्या. त्यासोबतच तंत्रज्ञानाच्या रॉयल्टीवरूनही सरकारसोबत कंपनीचे मतभेद झाले. परिणामी कंपनीने या भागातून आपला गाशा गुंडाळत चाचण्या थांबविण्याची घोषणा केली.

HTBT Cotton
HTBT Cotton : राज्यात 'एचटीबीटी' कापसाची लागवड होण्याची चिन्हे

त्यानंतरच्या काळात मात्र अवैध एचटीबिटी लागवडीचे पेव सर्वदूर फुटले. प्रतिबंध असूनही शेतकरी या बियाण्यांची लागवड करीत असल्याने अशा प्रकारात त्यांची फसवणूक होत असल्याचेही समोर आले आहे. अवैधरीत्या विक्री होत असल्याने एचटीबिटीची जादा दराने विक्री केली जाते.

गुजरात, तेलंगण या राज्यांतून याचा पुरवठा होतो. त्याची कोणतीच पावती दिली जात नसल्याने फसवणूक झाली तरी शेतकऱ्यांना तक्रार करता येत नाही.

आता नव्या हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर एचटीबीटी अवैधरीत्या विकणारे दलाल सक्रिय झाले आहेत. पूर्वी फसगत झालेल्या शेतकऱ्यांऐवजी नवे सावज शोधण्यावर भर देण्यात आला आहे. ४५० ग्रॅम पाकिटासाठी दोन हजार रुपयांची आकारणी या व्यवहारात होते, असे सूत्रांनी सांगितले.

हर्बिसाइड टोलरन्स बॅलिसिस ट्युरंगनेसीस (एचटीबिटी) असे याचे नाव आहे. याच्या वापरावर बंदी असल्याने याचा पुरवठा नेमका कोठून होतो, हे शोधण्यासाठी एका समितीचे गठण केले होते. परंतु त्या समितीने गाशा गुंडाळल्याचे वृत्त आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com