Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेत ७५४ जागांची भरती

ZP Recruitment : जिल्हा परिषदेतील ७५४ जागांसाठी भरती प्रक्रिया शनिवारपासून (ता. ५) सुरू झाली आहे.
Sangli ZP
Sangli ZPAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्हा परिषदेतील ७५४ जागांसाठी भरती प्रक्रिया शनिवारपासून (ता. ५) सुरू झाली आहे. आरोग्य पर्यवेक्षक, सेवक, परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांचा समावेश असून २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत जिल्हा परिषदेतही ७५४ पदांची सरळ सेवेद्‍वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध संवर्गाची अनेक पदे वर्षानुवर्षे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय व विकास कामांसाठी अडचणी येत आहेत.

Sangli ZP
ZP School Project : हेल्प मी सर....गोऱ्हे बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम

अखेर शासनाने जिल्हा परिषदेतील रिक्त जागांची भरती करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे ५ ते २५ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. भरतीस पात्र १७ संवर्गातील विविध पदासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबवली जाईल. भरतीसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे.

Sangli ZP
Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेचे ६६ कोटींचे अंदाजपत्रक सादर

संवर्गनिहाय रिक्त जागा

आरोग्य पर्यवेक्षक ४ जागा, कंत्राटी ग्रामसेवक ५२, आरोग्य सेवक (पु.) हंगामी फवारणीमधून १६८, आरोग्य सेवक (पु.) १७, आरोग्य सेवक (म) ३६६, औषध निर्माण अधिकारी २३, प्रयोगशाळा तंत्रज्ञ १, कनिष्ठ साहाय्यक (लिपिक) ३४, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, बांधकाम) २६,

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम, लघुपाटबंधारे) २३, कनिष्ठ आरेखक (बांधकाम) १, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका ९, पशुधन पर्यवेक्षक २२, विस्तार अधिकारी (कृषी) १, विस्तार अधिकारी (पंचायत) १, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २, कनिष्ठ सहायक लेखा ४ अशी एकूण सतरा संवर्गाची अंदाजे ७५४ पदांची भरती होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com