Sangli ZP : सांगली जिल्हा परिषदेचे ६६ कोटींचे अंदाजपत्रक सादर

गतवर्षीचे अंदाजपत्रक ७३ कोटींचे होते. मुद्रांक शुल्कची रक्कम न मिळाल्याने यंदाच्या अंदाजपत्रकात ७ कोटींनी घट झाली आहे.
Sangli ZP
Sangli ZPAgrowon

Sangli ZP News जिल्हा परिषदेने ट्रॅक्टर, पाझर तलाव, अनुदानावर शेळी गट वाटप, दिव्यांग कल्याण योजनांवरील (ZP Scheme) तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. शिक्षण आणि आरोग्यावर (Health) भर देणारे जिल्हा परिषदेचे २०२३-२४ चे ६६ कोटींचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जितेंद्र डुडी यांनी सादर केले.

गतवर्षीचे अंदाजपत्रक ७३ कोटींचे होते. मुद्रांक शुल्कची रक्कम न मिळाल्याने यंदाच्या अंदाजपत्रकात ७ कोटींनी घट झाली आहे. गतवर्षी २० मार्चपासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज लागू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जितेंद्र डुडी यांनी सलग दुसऱ्यांदा मिनी मंत्रालयाचे अंदाजपत्रक सादर केले.

Sangli ZP
Solapur ZP : मार्चअखेरमुळे जिल्हा परिषदेचे कामकाज शनिवारी, रविवारीही सुरु राहणार

डुडी यांनी २०२२-२३ चे अंतिम सुधारित आणि २०२३-२४ चे मूळ अंदाजपत्रक खातेप्रमुखांकडे मांडले.

गतवर्षीच्या मूळ अंदाजपत्रकात महसुली खर्च २९ कोटींचा होता. अंदाजपत्रकात ८ कोटींची वाढ होऊन तो ३७ कोटी ९३ लाख झाला आहे; तर भांडवली खर्च ३० कोटींवरून २८ कोटी २० लाख रुपये झाला आहे.

गतवर्षीच्या अंतिम सुधारित १३० कोटी १७ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. नव्या आर्थिक वर्षात मूळ अंदाजपत्रक ६६ कोटी १४ लाख ३० हजार रुपये अपेक्षित आहे.

खासगी रुग्णालयाच्या तोडीची चांगली सेवा देण्यासाठी ‘स्मार्ट पीएचसी’ करण्यास एक कोटी ८१ लाखांची तरतूद केली आहे. यातून अत्याधुनिक साधनसामग्री घेण्यात येणार आहे. असंसर्गजन्य आणि अन्य आजारांसाठी औषधे खरेदी करण्यात येतील.

Sangli ZP
Nagar ZP : ‘झेडपी’चे ४८ कोटीचे ‘बजेट’ सादर

जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले आहे. या उपक्रमाअंतर्गत आनंददायी शिक्षण उपक्रमासाठी १० लाख, तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांसाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. याशिवाय स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून गुणवत्ता चाचणीसाठी २० लाखांची तरतूद केली आहे.

अंदाजपत्रकातील वैशिष्ट्ये

ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान ९० लाख

शाळा देखभाल-दुरुस्तीसाठी एक कोटी २५ लाख

‘मॉडेल स्कूल’चा प्रचार, प्रसिद्धी १० लाख

क्रीडा स्पर्धांसाठी १५ लाख

आनंदायी शिक्षण १० लाख

पशुसंवर्धन विभागाला दीड कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com