Kharif Sowing : पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता

Kharif Season 2023 : पावसाने उघडीप दिल्याने पिकांची उगवण खुंटली असून दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालात स्पष्ट केले आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात ३७ हजार ८०१ हेक्टरवर खरीप हंगामातील पेरणी झाली आहे. पावसाने ओढ दिली आहे. त्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने पिकांची उगवण खुंटली असून दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालात स्पष्ट केले आहे. यंदाच्या खरीप हंगामातील क्षेत्र घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी मध्यावर आल्या आहेत. मात्र, जूनपासून पुरेसा पाऊस झाला नसल्याने पेरणीला गतीच नाही. परिणामी शेतकऱ्यांनी पेरणी केली नसल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर असून ३७ हजार ८०१ हेक्टरवर म्हणजे १४ टक्के इतकाच पेरा झाला आहे.

Kharif Sowing
kharif Sowing : पावसाच्या दडीनं दुबार पेरणीचं संकट?

कडधान्य, ज्वारी, बाजरी ही पिके दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, जत, कवठे महांकाळ या तालुक्यांत प्रामुख्याने घेतली जातात. परंतु या तालुक्यात या पिकांच्या पेरणीसाठी पाऊसच झाला नसल्याने या पिकांची पेरणी अत्यल्प झाली आहे. त्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : राज्यात ६० लाख हेक्टरवर पेरणी बाकी

शिराळा तालुक्यात ११ हजार १७० हेक्टरवर धूळवाफेवर भाताची पेरणी झाली असून उगवण चांगली आहे. परंतु रोप लागणीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात मक्याचे सरासरी क्षेत्र ४० हजार ७५३ हेक्टर असून ४०९५ हेक्टरवर लागवड झाली आहे.

सध्या वातावरणातील बदलामुळे मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सर्वाधिक पेरा भाताचा झाला आहे. तर सर्वांत कमी कडधान्ये, बाजरी, ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे.

पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पिकांची उगवण खुंटली आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज १२२१

जत २६१९

खानापूर ३३८

वाळवा ४६७९

तासगाव ३३५९

शिराळा १९१३३

आटपाडी १४४५

कवठे महांकाळ २५६५

पलूस १०४६

कडेगाव १३९५

एकूण ३७८०१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com