kharif Sowing : पावसाच्या दडीनं दुबार पेरणीचं संकट?

Team Agrowon

आकाशात ढगांची गर्दी

आकाशात ढगांची गर्दी मात्र पावसाची हजेरी काही मंडळात त्यातही काही गाव शिवारात तुरळक, हलकी, मध्यम असंच चित्र गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यातील पहावयास मिळत आहे.

kharif Sowing | Agrowon

पाणी साचलेल दिसत नाही

पावसात जोरच नसल्याने अजून कुठे पाणी साचलेल दिसत नाही. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाची हजेरी काही मंडळात तुरळक, हलकी, मध्यम स्वरूपाचीच राहिली.

kharif Sowing | Agrowon

तुरळक, हलका, मध्यम पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी ७६ मंडळात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. कन्नड, सोयगावसह सिल्लोड तालुक्यातील काही मंडळात पावसाचा जोर थोडा अधिक होता.

kharif Sowing | Agrowon

पावसाचा जोर थोडा अधिक

जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३१ मंडळात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील काही मंडळात पावसाचा जोर थोडा अधिक होता.

kharif Sowing | Agrowon

आंबाजोगाई व केज

बीड जिल्ह्यातील ६३ पैकी २५ मंडळात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. आंबाजोगाई व केजमधील काही मंडळात पावसाचा जोर थोडा अधिक होता.

kharif Sowing | Agrowon

पावसाची तुरळक हजेरी

लातूर जिल्ह्यातील ६० पैकी ४९ मंडळात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. रेनापुरसह अहमदपूर तालुक्यातील काही मंडळात पावसाचा जोर अधिक दिसून आला. धाराशिव जिल्ह्यातील ४२ पैकी केवळ १३ मंडळात पावसाची तुरळक हजेरी लागली.

kharif Sowing | Agrowon
Ruturaj patil | Agrowon