Bhigwan Fish Market : भिगवणच्या मासळी बाजारात दुर्मिळ चित्तल मासा

Chittal Fish : या माशामध्ये अधिकाधिक प्रथिने असल्याने याला मत्स्याहारी खवय्ये अधिक पसंती देतात.
Chittal Fish
Chittal FishAgrowon

बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळसह भारताच्या ब्रह्मपुत्रा, महानदी, गंगा व इंडस नद्यांच्या खोऱ्यात आढळणारा व चवीला अतिशय स्वादिष्ट असलेला चित्तल मासा भिगवण (ता. इंदापूर) येथील मच्छी बाजारात भलताच भाव खाऊन गेला. या माशामध्ये अधिकाधिक प्रथिने असल्याने याला मत्स्याहारी खवय्ये अधिक पसंती देतात.

Chittal Fish
Sukkat Fish : दोन महिन्यांत २५०० टन सुकटची विक्री

महाराष्ट्रातील नद्यांमध्ये दुर्मिळाने आढळणारा हा मासा तीन-चार दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे भोसले नावाच्या मच्छीमाराला एका तळ्यात सापडलेला हा मासा भिगवण येथील भगवान महाडिक यांच्या बापूसाहेब फिश मार्केटवर विक्रीला आला होता.

Chittal Fish
Fish Demand : खाडीतील माशांना मागणी वाढली

लिलाव बोलीत नवनाथ बंडगर यांनी अधिक बोली लावत खरेदी केला. पावणे दहा किलो वजनाच्या या माशाला भिगवणच्या प्रसिद्ध मासळी बाजारात प्रतिकिलो ५२० रुपये दर आल्याने या एका माशाला पाच हजार ७० रुपये एवढा उच्चांकी दर मिळाला आहे.

चित्तल माशाची वैशिष्ट्ये

चिताला असे शास्त्रीय नाव असलेल्या या माशाला इंडियन नाईफ फिश या नावानेही ओळखतात. या माशाचा रंग चकाकणारे रुपेरी असून, पाठीवर ठराविक अंतरावर सफेद आडवे पट्टे असतात. हे पट्टे शेपटीच्या टोकापर्यंत असतात. सुमारे तीन फूट लांब व अडीच फूट रुंद आकाराच्या या माशाचे प्रमुख खाद्य झिंगे, पाण्यातील कीटक व इतर लहान मासे हे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com