Sukkat Fish : दोन महिन्यांत २५०० टन सुकटची विक्री

Sukkat Fish Rate : अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील बंदरातून एप्रिल व मे या दोन महिन्यात २,५०० टन सुकट निर्यात करण्यात आली आहे.
Sukkat Fish
Sukkat FishAgrowon
Published on
Updated on

Alibaug News :अलिबाग तालुक्यातील नवगाव येथील बंदरातून एप्रिल व मे या दोन महिन्यात २,५०० टन सुकट निर्यात करण्यात आली आहे. राज्‍याबरोबरच छत्तीसगड, कर्नाटक, हरयाणा, बंगळुरू, विजयवाडा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरात आदी ठिकाणी सुकटला मोठी मागणी असल्‍याने रवाना करण्यात आली आहे.

यातून लाखोंची उलाढाल झाली असली, गतवर्षीच्या तुलनेने यंदा दर निम्‍म्‍याने घसरल्‍याचे मच्छीमारांकडून सांगण्यात आले आहे.

साधारण मार्चपासून जवळ्याचा हंगाम सुरू होतो. वाकटी, बोंबिलपेक्षा यंदा जवळा मोठ्या प्रमाणात जाळ्यात सापडला. जवळ्याची लॉटरीच लागल्‍याने मच्छीमार सुखावले होते. जवळ्याच्या विक्रीतून चांगला आर्थिक फायदा होण्याची अपेक्षा होती.

Sukkat Fish
Fish Market : मच्छीमारांना मासळी बाजाराची प्रतीक्षा

मात्र यंदा उत्‍पादन वाढल्‍याने दरात घसरण झाली. दोन महिन्यात जवळपास अडीचशे टन जवळा वेगवेगळ्या राज्‍यात निर्यात झाला आहे. पावसाळ्यापूर्वी अनेकांकडून सुक्‍या मासळीची खरेदी करण्यात येते.

गत वर्षी दहा किलो जवळ्यामागे ७३० रुपये मिळाले होते. यंदा मात्र अवघा ४३० रुपये दर मिळाल्‍याने ३१० रुपयांचा तोटा सहन करावा लागल्‍याचे मच्छीमार सांगतात.

यंदा जाळ्यात मोठ्या प्रमाणात जवळा सापडला. परंतु मच्छीमारांना अपेक्षित दर मिळाला नाही. गत वर्षीच्या तुलनेने ३०० रुपयांचा फटका दहा किलो मागे बसल्याने मच्छीमारांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
नीलेश घातकी, मच्छीमार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com