Fish Demand : खाडीतील माशांना मागणी वाढली

Fish Market : समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे सध्या खाडीतील माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे मिळत नसल्याने दर वधारले आहेत.
Fish
Fish Agrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे सध्या खाडीतील माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे मिळत नसल्याने दर वधारले आहेत.

दोनशे ते तीनशे रुपयांना मिळणारे खेकडे सहाशे रुपयांवर तर पावसात मिळणारी काकई, तिसरे, लेपी, सुळे, कांटा, ताऊज यासारखी मासळीही पाचशे ते सहाशे रुपये किलोने विकली जात आहे.

खाडीतील माशांचे प्रमाण कमी असल्याने अनेक खवय्ये चिकनकडे वळू लागले आहेत. तिथेही किलोचा दर नेट २८० ते २९० रुपयांवर पोहोचला आहे.

मोसमी पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोकण किनारपट्टीवर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कडकडीत ऊन पडले आहे. बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे समुद्रही खवळलेला आहे. १ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली.

त्यानंतर खाडीमध्ये मासेमारीला सुरुवात झाली. पावसाला किनारी भागात येणारे मासेही सापडू लागले आहेत. या माशांचे प्रमाणे कमी असल्याने खवय्यांची पंचाईत झाली आहे.

Fish
Sukkat Fish : दोन महिन्यांत २५०० टन सुकटची विक्री

रत्नागिरी शहराजवळील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर माशांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. हंगामामध्ये ताजे मासे खरेदीसाठी अनेक जण सकाळी व सायंकाळी तिथे हजेरी लावतात. मासे खरेदी करताना अनेकांना सध्या जास्त दराने खरेदी करावी लागत आहे. मोठा खेकडा ६०० रुपयांना एक या प्रमाणे विकला जात होता. तिसरे किंवा मुळे १५० रुपये शेर होते. त्यांचा दर आता शंभर रुपयांवर पोहोचला आहे.

Fish
Fishing Latest Update : वलगणीच्या माशांची प्रतीक्षा

पावसाळ्यात मिळणारा ताऊज मासा खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडते. याला २५० ते ३०० रुपये अर्धा किलोला दर आहे. किलोला ५०० ते ६०० रुपये दर मिळत आहेत.

बोयरं, रेणवी हे मासेही याच दराने विकण्यात येत आहेत. लेपी, सुळे, कांटा, खाडीची कोळंबी यासारखी मासळी विक्रीला ठेवण्यात आली होती. त्याचेही दर वधारलेले आहेत.

सध्या कोकणात आकाडीचा सण साजरा होत असल्यामुळे चिकन, मटणाला मोठी मागणी आहे. काहीजण मासे आणून त्यावर इच्छा भागवून घेतात. पण माशांचे दर आणि कमी प्रमाण यामुळे काहींचा कल चिकन खरेदीकडे आहे. तिथेही चिकनचे दर तीनशे रुपये किलो आहेत. त्यामुळे यंदा आकाडीवर महागाईचे सावट निर्माण झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com