Rajaram Karkhana : राजाराम कारखान्याच्या सभेत गोंधळ ; सत्ताधाऱ्यांकडून सर्व विषय मंजूर

Amal Mahadik : राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता.२९) शुक्रवारी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर सुरू झाली. नोटीस वाचण्यापूर्वीच सभेत गोंधळ सुरू झाल्याने सर्व विषय मंजूर झाले.
Rajaram Karkhana
Rajaram KarkhanaAgrowon
Published on
Updated on

Amal Mahadik vs Satej Patil : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता.२९) शुक्रवारी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली. दरम्यान नोटीस वाचण्यापूर्वीच सभेत गोंधळ सुरू झाल्याने सर्व विषय मंजूर झाले.

या गदारोळात सत्ताधारी गटाकडून राजारामच्या विस्ताराचा विषय मंजूर करण्यात आला. तर दुसरीकडे कारखानास्थळी सभासदांना जेवणाचा बेत करण्यात आल्याने निम्मे सभासद जेवणात गुंतले होते तर निम्मे सभासद सभास्थळी होते. या सगळ्यात सभा अवघ्या काही मिनीटांत गुंडाळण्यात आल्याचा आरोप विरोधी गटाकडून करण्यात आला.

Rajaram Karkhana
Rajaram Sakhar Karkhana : राजाराम कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवण्यात येणार! सांगलीतील येलूरसह ४२ गावांचा समावेश

दरम्यान मागच्या ५ महिन्यांपूर्वी राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. यावेळी महाडिक गटाने सत्ता राखल्याने या वार्षिक सभेला राडा होणार याची शक्यता पहिल्यापासून वर्तवली जात होती. मागच्या १५ दिवसांपासून विरोधकांकडून राजारामच्या काराभाराविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात झाली होती. यामध्ये विरोधी गटाचे आमदार सतेज पाटील यांनी विरोधकांना ९ प्रश्न विचारले होते.सभेतील सर्व विषय मंजूर

दरम्यान विचारलेल्या प्रश्नांवर कार्यकारी संचालकांनी नोंद घेत पोस्टाने उत्तर पाठवण्यात आल्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी पलटवार केला. तसेच राजाराम कारखान्याने कार्यक्षेत्रात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर सभासदत्व, उमेदवारीसह सूचक, अनुमोदकाबाबत नवीन नियमावली केली असून, तो पोटनियम दुरुस्तीसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला. यावर, विरोधी गटाने जोरदार हरकत घेतली. परंतु गोंधळात हे सर्व विषय सत्ताधाऱ्यांकडून मंजूर करण्यात आले.

Rajaram Karkhana
Rajaram Sakhar Karkhana : राजारामच्या वार्षीक सभेत होणार राडा? सभासदांना पंचपक्वान जेवणाचा बेत, सतेज पाटील आक्रमक

विरोधी गट आक्रमक

कार्यक्षेत्रातील उपलब्ध ऊस उचलता येत नसताना वाळवा तालुक्यातील उसाची उचल कशी करणार? यावर विरोधी गटाने आक्षेप घेतला. कार्यक्षेत्रातील गावांची मागणी आणि कारखान्याची गाळप क्षमता वाढवणार असल्याने उसाची गरज पाहून हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण सत्तारुढ गटाने दिले. यावेळी सत्ताधारी गटातील सभासदांनी मंजूर, मंजूर म्हणत हात वर केला तर विरोधी गटातील सभासदांनी नामंजूर म्हणत जोरदार घोषणाबाजी केली.

अमल महाडिकांचे उत्तर

वार्षिक सभेसाठी ज्या सभासदांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची लेखी उत्तरे प्रश्नकर्त्या सभासदांना पोस्टाने पाठवली आहेत. तसेच कारखान्याच्या अॅपवरदेखील सर्व सभासदांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली आहेत. याव्यतिरिक्त अधिक खुलासेवार माहिती वार्षिक सभेच्यावेळी देण्यात आली, अशी माहिती चेअरमन अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com