Rajaram Sakhar Karkhana : राजारामच्या वार्षीक सभेत होणार राडा? सभासदांना पंचपक्वान जेवणाचा बेत, सतेज पाटील आक्रमक

satej patil and amal mahadik : महाडिक आणि पाटील गटाचा राजारामच्या वार्षीक सर्वसाधारण सभेतून वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
satej patil and amal mahadik
satej patil and amal mahadikagrowon
Published on
Updated on

Mahadevrao Mahadik vs Satej Patil : सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबियांमधील टोकाचा वाद महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. दरम्यान मागच्या ५ महिन्यांपासून पुन्हा पाटील विरूद्ध महाडिक असा वाद टोकाला जात असल्याचे दिसून येत आहे. मागच्या ५ महिन्यांपूर्वी राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील गटाचा दारून पराभव झाला. यानंतर राजारामच्या वार्षीक सर्वसाधारण सभेतून हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण वार्षिक सभा २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये विरोधी गटाचे आमदार सतेज पाटील यांनी राजारामच्या कारभाऱ्यांवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांकडून कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवण्यात येणार असून, होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यासंदर्भातील पोटनियम दुरुस्तीचा ठराव करण्यात येणार आहे. या मुद्दावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

या ठरावानुसार कार्यक्षेत्रात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचा समावेश करण्यात येणार असून, सध्या कार्यक्षेत्रात असलेल्या तालुक्यातील नव्या ४२ गावांचा समावेशही होणार आहे. वाढीव कार्यक्षेत्रात कोल्हापूर दक्षिणमधील १४, हातकणंगले तालुक्यातील १४, वाळवा तालुक्यातील येलूरसह १३ व पन्हाळा तालुक्यातील वाघवे अशा ४२ नव्या गावांचा यात समावेश होणार आहे.

सतेज पाटील या मुद्दावरून आक्रमक

आमदार सतेज पाटील टीका करत म्हणाले की, राजाराम कारखान्याचे कोल्हापूरमधील कार्यक्षेत्र वाढवत आहात, हे समजू शकतो. मात्र, सांगली जिल्ह्यातील येलूर आणि वाळवा तालुक्यातील सभासद करता यावेत, यासाठीच पोटनियम बदलला जात आहे.

यापेक्षा आयत्यावेळेचा एकच विषय आणून राजाराम कारखाना 'महाडिक प्रा. लिमिटेड' करण्याचा 'ठराव करावा', अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली. याचबरोबर सभा १० वाजता होणार असल्याने सभासद वेळेत येतील का? असाही सवाल उपस्थित केला आहे. सत्ताधाऱ्यांचा सभा गुंडाळण्याचा डाव असल्याचा थेट आरोप सतेज पाटलांनी केला आहे.

satej patil and amal mahadik
Rajaram Sahkari Sakhar Karkhana : अमल महाडिकांचे सतेज पाटील यांना प्रत्त्यूत्तर, ही तर सहकाराची चेष्टा...

अमल महाडिक आव्हान स्विकारणार का?

यावर अमल महाडिक यांनीही सतेज पाटील यांच्यावर पलटवार करत म्हणाले की, 'कारखान्याचा विस्तार होत आहे, त्याला विरोध करण्याचे कारण काय? पूर्वी विस्तार होत नव्हता म्हणून टीका करत होतात. आता विस्तार करण्यास सुरुवात केल्यानंतरही टीका होत आहे. सभेत कारखान्यात कार्यक्षेत्र वाढवण्याबाबत ठराव होणारच आहे. त्याला विरोध करू नये,' असा इशारा महाडिकांनी विरोधकांना दिला आहे.

वार्षीक सभेला जेवणाचा बेत

उद्या होणाऱ्या वार्षीक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी सभासदांना पंचपक्वान जेवणाचा बेत ठेवला असल्याची खुमासदार चर्चा रंगली आहे. दरम्यान सभास्थळी गोंधळ होणार असल्याची आदीच सभासदांना कूणकूण असल्याने नेमका राजाराममध्ये कुठे राडा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सतेज पाटील गटाकडून प्रश्नांची सरबत्ती होणार

मागच्या ५ महिन्यांपूर्वी सतेज पाटील यांनी १२७२ सभासद अपात्र असल्याचा आरोप केला होता. दरम्यान यावर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी निकाल देत १२७२ सभासद अपात्र केले. यामध्ये सतेज पाटील यांनी यश आले असले तरी महाडिक गटाकडून कारखान्याचा विस्तार करण्यासाठी पोटनियमात बदल करण्याचा विषय सभेत मांडण्यात येणार आहे. यावरून सतेज पाटील गट आणि महाडिक गटामध्ये जोरदार राडा होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com