Rajaram Sakhar Karkhana : राजाराम कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवण्यात येणार! सांगलीतील येलूरसह ४२ गावांचा समावेश

Amal Mahadik : कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची २९ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे.
Rajaram Sakhar Karkhana
Rajaram Sakhar Karkhanaagrowon
Published on
Updated on

Rajaram Sahkari Sakhar Karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची २९ सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे याही वर्षी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

राजाराम सहकारी कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांकडून कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवण्यात येणार असून, शुक्रवारी (ता. २९) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत त्यासंदर्भातील पोटनियम दुरुस्तीचा ठराव करण्यात येणार आहे. या मुद्दावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

या ठरावानुसार कार्यक्षेत्रात सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याचा समावेश करण्यात येणार असून, सध्या कार्यक्षेत्रात असलेल्या तालुक्यातील नव्या ४२ गावांचा समावेशही होणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाढीव कार्यक्षेत्रात कोल्हापूर दक्षिणमधील १४, हातकणंगले तालुक्यातील १४, वाळवा तालुक्यातील येलूरसह १३ व पन्हाळा तालुक्यातील वाघवे अशा ४२ नव्या गावांचा यात समावेश होणार आहे.

सहवीज प्रकल्पाची उभारणी व कारखान्याच्या मशिनरी आधुनिकीकरणासाठी उसाची गरज म्हणून हे कार्यक्षेत्र वाढवण्यात येणार असल्याचे कारखाना प्रशासनाने पोटनियम दुरुस्तीसंदर्भात म्हटले आहे.

मागच्या ५ महिन्यांपूर्वी झालेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीवेळी माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील गटात टोकाचा संघर्ष पहायला मिळाला. ५ महिन्यांपूर्वी झालेली निवडणूक पाटील यांनी सगळी ताकद पणाला लावून लढवली; पण महादेवराव महाडिक व अमल या पित्रापुत्रांनी सर्व जागा जिंकून एकहाती कारखान्यावर सत्ता मिळवली.

दरम्यान यानंतर मागच्या काही दिवसांपूर्वी प्रादेशिक साखर सहसंचालकांनी निवडणुकीपूर्वी अपात्र ठरलेले कारखान्याचे १२७२ सभासद पात्र ठरवण्याचा निर्णय दिला आहे यावरून पाटील यांनी फेरनिवडणुकीची मागणी करतानाच याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कारखान्याच्या पाच वर्षानंतर होणारी काटाजोड लढत सोपी व्हावी यादृष्टीने कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारताना स्वतःच्या येल्लूर गावांसह वाळवा तालुक्यात वर्चस्व असलेल्या १४ गावांचा कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा घाट घातला आहे.

Rajaram Sakhar Karkhana
Satej Patil vs Amal Mahadik : गोकुळ झालं आता राजाराम कारखान्यात होणार राडा? सतेज पाटलांनी केला महाडिकांवर आरोप

उमेदवारांसाठीही जाचक अटी

कारखान्याची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना सूचक अनुमोदक राहणाऱ्या सभासदांचा पाच वर्षांत किमान सलग चार वर्षे कारखान्याला त्यांच्या नावे असलेला सगळा ऊस पुरवठा करण्याची अटही पोटनियम दुरुस्ती करून घातली आहे. हा पोटनियमही मंजुरीसाठी शुक्रवारच्या सभेत ठेवण्यात आला आहे.

ही गावे वाढणार

करवीर कोगील खुर्द, कोगील बुद्रुक, नेर्लीीं, तामगाव, हलसवडे. दऱ्याचे वडगाव, नंदगाव, नागाव, वडकशिवाले, चुये, कावणे, इस्पुर्ली, जैत्याळ, उजळाईवाडी.

हातकणंगले कासारवाडी, अंबपवाडी, अंबप, मनपाडळे, पाडळी, वाठार तर्फ वडगाव, चावरे, निलेवाडी, पारगाव, तळसंदे घुणकी, किणी, बुवांचे वाठार अतिग्रे. वाळवा येलूर, तांदूळवाडी, कोरेगाव, मालेवाडी, कुंडलवाडी, फारणेवाडी, शिगाव, इटकरे, कासेगाव, भरतवाडी, बहाद्दूरवाडी, ढवळी, बागणी. पन्हाळा - वाघवे

संस्था गटाचे अस्तित्व संपुष्टात

कारखाना निवडणुकीत सुरक्षित म्हणून संस्था गटातून महादेवराव महाडिक निवडून येतात. नव्या पोटनियमात हा गटच रद्द केला असून, या गटातील सभासदांना उत्पादक गटातील उमेदवारांना मतदान करता येईल; पण त्याचवेळी त्यांना कोणत्याही गटातून निवडणूक लढवता येणार नाही, असा बदल केला आहे. संस्था गटातील एक जागा शिरोली पुलाची व मुडशिंगी या गट क्रमांक चारमध्ये वाढवून या गटाची संचालक संख्या चार करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com