Raj Thackeray : महाराष्ट्राचा ‘दिगू टिपणीस’झाला ः राज ठाकरे

Ajit Pawar Latest News : जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘सिंहासन’ हा तत्कालीन राजकारणातील अधोगतीवर भाष्य करणारा चित्रपट खूप गाजला होता. त्यामध्ये दिगू टिपणीस हे पत्रकाराचे पात्र निळू फुले यांनी साकारले होते.
Raj Thackeray
Raj Thackeray Agrowon
Published on: 
Updated on: 

Mumbai News : ‘‘आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला,’’ अशी तिखट प्रतिक्रिया महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडींवर व्यक्त केली.

जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला ‘सिंहासन’ हा तत्कालीन राजकारणातील अधोगतीवर भाष्य करणारा चित्रपट खूप गाजला होता. त्यामध्ये दिगू टिपणीस हे पत्रकाराचे पात्र निळू फुले यांनी साकारले होते.

Raj Thackeray
Ajit Pawar News : अजित पवारांच्या बंडावर शरद पवारांची भूमिका काय?

राजकारणातील उलथापालथींमुळे शेवटी या पत्रकाराला वेड लागते. त्याचा संदर्भ देऊन श्री. ठाकरे आपल्या ट्विटरवरील प्रतिक्रियेत पुढे म्हणतात, ‘ उद्धव ठाकरेंचे ओझे शरद पवारांना उतरवायचे होते, त्याचा पहिला अंक आज पार पडला.

पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली. यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसेही महाराष्ट्र भाजपला शिंदे यांना दिले जाणारे (अवास्तव) महत्त्व रुचत नव्हतेच, त्यावर अनायसे उतारा शोधला.’’

Raj Thackeray
Ajit Pawar Latest News : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्याच्या राजकारणात भूकंप

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘यात देशासमोर चित्र काय उभे राहतेय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचे प्रबोधन केले, त्या राज्याचे राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेले आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.

बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे, याची खात्री असल्यामुळे या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरू राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचे हे किळसवाणी राजकारण बंद पाडणार?’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com