Weather Update : राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सूरू असतानाच, राज्यात सर्वदूर पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसाला पोषक हवामानामुळे झाल्याने विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : मॉन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) सूरू असतानाच, राज्यात सर्वदूर पावसाचे पुनरागमन (Rainfall) झाले आहे. पावसाला पोषक हवामानामुळे (Favorable Weather Condition For Rain) झाल्याने विविध भागात पावसाने हजेरी (Rain Update) लावली आहे. आज (ता. ८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning and Thunder) हवामान विभागाने वर्तविली आहे.

परतीच्या वाटचालीत मॉन्सूनची उत्तरकशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा शुक्रवारी (ता. ७) कायम होती. तेलंगणा आणि विदर्भ परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Weather Update
Monsoon Update : वायव्य भारतातून मॉन्सून परतला

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापासून तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरातपर्यंत एक, तसेच तेलंगणा, विदर्भ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेष उत्तराखंड पर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Update
Rain Update : जळगावमधील ११ प्रकल्प १०० टक्के भरले

वरील प्रणाली पोषक ठरल्यामुळे राज्यात सर्वदूर हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाची हजेरी, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत असले तरी उकाडा मात्र वाढला आहे. आज (ता. ८) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता.८) राज्यातील पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग) :

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com