Urad Harvesting : खानदेशात उडीद मळणीत पावसाने व्यत्यय

Kahndesh News : खानदेशात उडदाचे पीक काळ्या कसदार जमिनीच्या क्षेत्रात जेमतेम हाती येत आहे, यातच मागील दोन दिवस मध्येच पाऊस येत आहे.
Urad Harvesting
Urad Harvesting Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात उडदाचे पीक काळ्या कसदार जमिनीच्या क्षेत्रात जेमतेम हाती येत आहे, यातच मागील दोन दिवस मध्येच पाऊस येत आहे. यामुळे उडीद मळणीसंबंधी शेतकऱ्यांची धावपळ होत आहे.

उडदाची पाने हिरवी आहेत. काही शेंगाही पावसाळी वातावरणाने वाळण्यासंबंधी अडचण येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेंगा पक्व झालेल्या क्षेत्रात तणनाशकांची फवारणी केली. यात उडदाची पाने कोरडी होऊन गळून पडत आहेत.

लागलीच उडीद कापून तो गोळा करून सुधारित ट्रॅक्टरचलित मळणी यंत्राने शेतकरी मळणी करून घेत आहेत. मळणीनंतर उडीद वाळवून घ्यावा लागत आहे. परंतु मागील दोन ते तीन दिवस पावसाळी, ढगाळ, उष्ण, असे विषम वातावरण असल्याने शेतकरी उडीद तसेच साठवून ठेवत आहेत. उडीद कापणी, गोळा करण्यासंबंधी एकरी चार हजार रुपये मजुरी यंदा लागत आहे. मजुरीचे दर सतत वाढत आहेत. अशात नैसर्गिक समस्येमुळे शेतकरी आणखीच अडचणीत येत आहेत.

Urad Harvesting
Mung, Urad Pest : मूग, उडीद पिकांवरील कीड व्यवस्थापन

खानदेशात या महिन्याच्या सुरुवातीलाच उडीद मळणीवर आला. ६ ते ८ सप्टेंबरपूर्वी कोरडे वातावरण काही दिवस होते. या कालावधीत अनेकांनी उदडाची कापणी, मळणी वेगात करून घेतली. या उडदाची बाजारात आवकही झाली. परंतु ६ ते ८ सप्टेंबर दरम्यान पाऊस झाला. यानंतर काही दिवस ढगाळ, तुरळक पाऊस वातावरण होते. या कालावधीत शेतकऱ्यांनी उडीद कापणीचे काम हाती घेतले.

Urad Harvesting
Urad Market : खानदेशात उडीद आवक सुरू

पण आता पुन्हा मागील तीन दिवस पावसाळी व ढगाळ वातावरण आहे. गुरुवारी (ता.२१) अनेक भागांत मध्यम ते हलका पाऊसही झाला. यामुळे दोन दिवसांपासून उडीद, कापणी, मळणीचे काम ठप्प झाल्याची स्थिती आहे. उडदाचे दर यंदा बऱ्यापैकी आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेर नदीच्या क्षेत्रात दर्जेदार पीक आहे.

कमी पावसाथही काळ्या कसदार जमिनीत पिकाने तग धरला. त्याची मळणी हाती घेताच पावसाने व्यत्यय आणायला सुरुवात केली आहे. पावसामुळे कापणी व मळणी लांबली आहे. त्यात अधिकचा पाऊस आल्यास उडदाचे कोंब अंकुरण होऊन नुकसान होईल, अशी भीतीही आहे. तसेच सतत आर्द्रता राहिल्यास दर्जाही घसरेल. यंदा उडदाची पेरणीच कमी झाली. कारण जूनमध्ये पाऊस नव्हता. ऑगस्टमध्ये २५ ते २७ दिवस पावसाचा खंड होता. यामुळे उडीद उत्पादकतेला फटका बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com