नरसी फाटा, जि. नांदेड ः तालुक्यातील नरसी परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी उशिरा रब्बी हंगामातील (Rabi Season) पेरणी (Chana Sowing) केलेल्याने हरभऱ्याची वाढ (Chana Growth) खुंटल्याने नरसी व परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हरभरा या पिकाची वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कंपन्यांचे टॉनिक घेऊन फवारणी करावी लागत असल्याने यंदा हारभरा लागवडीचा (Chana Cultivation) खर्चही वाढला आहे.
गतवर्षातील पाऊस हा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होता त्यामुळे नरसी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीची कोणतीच कामे करता न आल्याने शेतात प्रचंड तण वाढले होते. पाऊस गेल्यानंतर शेतातील वापसा येण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. हरभरा पेरणी ही ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या पहील्या आठवड्यात करणे अपेक्षित असते.
तथापी, यावर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी केली. म्हणजेच रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला. नरसी परिसरात आजही गहू पेरणी सुरू आहे. परंतु उशिरा केलेल्या पेरणीमुळे अनेक भागातील हरभरा पिकाची वाढ खुटंल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे हरभरा पीक वाढीसाठी नरसी परिसरातील शेतकरी विविध प्रकारची औषध (टॉनिक) फवारणी करीत आहेत.
काही भागात हरभरा पीक पिवळे पडत असल्याने बुरशीनाशक फवारणी करण्यात येत आहे. हरभऱ्याचे झाडे वाढावीत, त्याला फूटवे यावे यासाठीचे विविध प्रयत्न करीत असताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे हरभरा या पिकांवर घाटेअळीने तोंड वर काढले आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी कीटक नाशकांची फवारणीही येथील शेतकऱ्यांना करावी लागत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.