Sugar Market : ऑक्टोबरचा साखर कोटा दहा दिवस आधीच जाहीर

Sugar Industry : केंद्राने सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर संभाव्य साखर दरवाढ रोखण्याची खेळी करताना ऑक्‍टोबरचा कोटा तब्बल दहा दिवस आधीच जाहीर केला.
Sugar Market
Sugar MarketAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : केंद्राने सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर संभाव्य साखर दरवाढ रोखण्याची खेळी करताना ऑक्‍टोबरचा कोटा तब्बल दहा दिवस आधीच जाहीर केला. या कोट्याचा पहिला भाग म्हणून १३ लाख टनांचा कोटा देशातील साखर कारखान्‍यांना जाहीर केला आहे. गुरुवारी (ता. २१) अन्‍न व सार्वजनिक वितरण विभागाने ट्‍विट करून ही माहिती दिली. विशेष म्हणजे कोटा ऑक्टोबरचा असला तरी ही साखर तातडीनेही विकू शकतात, असेही सांगण्यात आले आहे.

ज्यांचे सप्‍टेंबरचे कोटे संपलेले आहेत. ते कारखाने पुढील महिन्याची साखरही आतापासूनच विकू शकतात. मंत्रालयाने हा कोटा अंतिम नसल्याचे स्पष्ट करत कोट्याचा पहिला भाग आहे, असे सूचित केले आहे. यामुळे येत्या काही दिवसांत आणखी जादा कोटा कारखान्यांना मिळू शकतो, असा अंदाज आहे.

साखरेचे दर वाढू नयेत म्हणून केंद्र महिना संपायच्या आतच कोटे जाहीर करत असल्‍याने कारखानदारांना मात्र धक्का बसला आहे. केंद्राने मुदतीआधीच कोटे जाहीर करत साखर दरवाढीच्या अपेक्षेत असणाऱ्या कारखानदारांची निराशा केल्याचा आरोप साखर उद्योगातून होत आहे.

Sugar Market
Sugar Rate : भविष्यात साखरेचे संकट, जागतिक साखर संस्थेकडून आकडेवारी जाहीर

ऑगस्ट महिन्यापासून केंद्राने कारखानदारांची साखरेची माहिती देण्यासाठी अक्षरशः पाठ धरली आहे. विक्री कोट्याची माहिती घ्यायची आणि तातडीने साखर कोटे जादा जाहीर करायचे असे प्रयत्‍न सुरू केल्याने देशांतर्गत बाजारात वाढणाऱ्या साखर किमतीला ब्रेक लागला आहे. यामुळे साखर विक्रीतून जादा रक्कम येईल या कारखानदारांच्या अपेक्षेला सुरुंग लागल्‍यासारखी स्थिती आहे. ऑक्टोबरचा कोटा आताच विकता येणार आहे.

यामुळे बाजारात आणखी साखर येण्याची शक्यता असल्‍याने सध्या तरी साखर दरवाढीची शक्‍यता कमी असल्‍याचे सांगितले जात आहे. केंद्र एका महिन्यात दोन-तीन वेळा कोटे जाहीर करत आहे आणि जितके कोटे दिले आहेत तितकी साखर विक्रीसाठीही दबाव आणत आहे. सध्या गणेशोत्‍सवाचा कालावधी असल्‍याने साखरेंच्या किमती नियंत्रित रहाण्यासाठी केंद्राने सप्टेंबर संपायच्या आधी तब्बल दहा दिवस अगोदरच कोटा जाहीर करून आपला इरादा स्‍पष्‍ट केला आहे.

Sugar Market
Sugar Rate : देशात सध्या साखरेचे दर स्थिर; ऑक्‍टोंबरमध्ये दरवाढीची शक्‍यता

साखर खरेदीच्या गतीवर ठरणार दर

केंद्राने लवकर कोटा जाहीर केल्याने आता साखरेची खरेदी किती गतीने होते यावरच साखरेचे येत्या महिन्याभरातील दर ठरतील, अशी शक्यता आहे. साखरेच्या देशांतर्गत बाजारपेठेबाबत धोरणात्मक निर्णय केंद्र अपेक्षेपेक्षा लवकर घेत आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे सणासुदीत साखरेचे दर कितपत वाढतील याबाबत सध्या तरी साखर उद्योगाला अंदाज नसल्याची स्थिती आहे.

साठ्याची माहिती भरण्याचे आदेश

सार्वजनिक वितरण विभागाने साखर साठ्याबाबतता आणखीन एक आदेश निर्गमित केला आहे. घाऊक, किरकोळ साखर विक्रेते, आदींनी आपल्या साखर साठ्याची माहिती पोर्टलवर तातडीन भरावी, असे आदेश काढले आहेत. प्रत्येक सोमवारी याचा आढावा घेण्यात येणार असल्‍याचेही या आदेशात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com