Lokseva Ayog : नवी मुंबईत होणार लोकसेवा आयोग भवन ः डॉ. दिघावकर

राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र इमारत उभारणीसाठी बेलापूर येथे ४७५७.४४ चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून दिला आहे.
Lokseva Ayog
Lokseva AyogAgrowon

नाशिक : बहुप्रतिक्षित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (Maharashtra Public Service Commission) स्वतंत्र कार्यालय तथा लोकसेवा आयोग भवन (Lokseva Ayog Bhavan) बेलापूर (सीबीडी) येथे साकारणार असून नियोजित इमारतीच्या बांधकामास राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती लोकसेवा आयोगाचे सदस्य डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली.

Lokseva Ayog
Agriculture Economy : आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यात परंपरेची आडकाठी ?

राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र इमारत उभारणीसाठी बेलापूर येथे ४७५७.४४ चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करून दिला आहे. भूखंडाचे संरक्षण करण्यासाठी त्याभोवती संरक्षण भिंत त्वरित बांधण्यासाठी २०१९ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

Lokseva Ayog
Agriculture Management : लागवडीसह विक्री पद्धतीतील सुधारणांमुळे उत्पन्नात वाढ

दरम्यान लोकसेवा आयोगाकडून २०१९ मध्ये सादर करण्यात आलेल्या इमारत बांधकाम ९७ कोटी ४६ लाख ९६ हजार ५०४ रुपये खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रशासकीय मान्यततेत संरक्षण भिंत बांधण्याच्या खर्चाचा समावेश असल्याने प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली होती.

दरम्यान, लोकसेवा आयोगाच्या आताच्या सदस्यांनी इमारतीसाठी शासनाने पाठपुरावा सुरू करून २२ एप्रिल २०२२ रोजी बांधकामक्षेत्रातील झालेली वाढ अन्य बदलांसह २९१ कोटी १८ लाख ५८ हजार इतक्या खर्चाचे सुधारित अंदाजपत्रकाचा प्रस्ताव शासनास सादर केला. ११ ऑक्टोबर रोजी उच्चाधिकारी सचिव समितीच्या बैठकीमध्ये मान्यतेस्तव सदर प्रस्ताव ठेवण्यात आला. प्रस्तावावर चर्चा होऊन मूळ प्रशासकीय मान्यता रद्द करून २८२ कोटी २५ लाख खर्चाच्या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com