Sugarcane Labor : ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्‍नी १२ जूनला मंत्रालयासमोर आंदोलन

Sugarcane Season : ऊसतोडणी कामासाठी दिलेली उचल, आगाऊ रकमेच्या वसुलीसाठी ऊसतोडणी मजुरांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.
Sugarcane Labor
Sugarcane LaborAgrowon

Pune News : ‘‘ऊसतोडणी कामासाठी दिलेली उचल, आगाऊ रकमेच्या वसुलीसाठी ऊसतोडणी मजुरांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या ऊसतोडणी मजुरांना रोजगारात घट झाल्याबद्दल आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे.

परंतु सरकार ते टाळत असून सरकारच्या पक्षपाती व अन्यायकारक कार्यपद्धतीच्या निषेधार्थ व आयटक प्रणित लालबावटा ऊसतोडणी कामगार, मुकादम आणि वाहतूकदार युनियनच्या वतीने १२ जून रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल’’, अशी माहिती राजन क्षीरसागर यांनी शुक्रवारी (ता.२६) पत्रकार परिषदेत दिली

क्षीरसागर म्हणाले, ‘‘राज्यात सुमारे दहा लाख पेक्षा जास्त ऊसतोडणी कामगार कार्यरत आहेत. निकृष्ट दर्जाचे जीवनमान जगत असलेल्या या कामगारांसाठी कोणतेही कायदेशीर संरक्षण व सामाजिक सुरक्षा अस्तित्वात नाही. या मजुरांना कोणत्याही कायदेशीर तरतुदी व सामाजिक सुरक्षा लागू न करता साखर कारखाने राबवून घेत आहेत.

Sugarcane Labor
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ देण्याची गती मंदच

गेल्या गळीत हंगामात उसाचे एकरी उत्पादन घटले असल्याचे साखर आयुक्त यांनी जाहीर केले आहे. त्याचे गंभीर परिणाम ऊसतोडणी मजुरांना भोगावे लागत आहेत. यामुळे राबून देखील दिवसाकाठी उसाचे पुरेसे वजन न भरल्याने ऊसतोडणी मजुरांच्या मजुरीत घट झाली आहे.’’

‘‘मजुरांकडील उचल वसूल करण्यासाठी साखर कारखानदार आणि त्यांचे एजंट अपहरण, डांबून मारहाण, खंडणी वसूल करणे इत्यादी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करीत आहेत. अशा प्रकारच्या शेकडो घटना चाळीसगाव, कन्नड, सिल्लोड, जाफराबाद, भोकरदन, मंठा, लोणार, जिंतूर, रिसोड, सेनगाव, औढा, कळमनुरी तालुक्यात घडत आहेत.

अनेक प्रकरणात पोलिसांचा व्यवहार साखर कारखानदार धार्जिणा आहे. अशा घटनांबाबत पोलिस स्टेशनच्या डायरीत नोंद देखील घेण्याचे टाळले जाते,’’ असा संताप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

Sugarcane Labor
Sugarcane FRP : राज्यातील किती साखर कारखान्यांनी थकविली एफआरपी?

युनियनने केलेल्या मागण्या :

- कोल्हापूर पोलिस प्रशासनाने दाखल केलेले १५० गुन्हे तत्काळ स्थगित करा

- साखर आयुक्त कार्यालयाने जाहीर केल्याप्रमाणे प्रतिटन ५० रुपये विशेष भत्ता मजुरांना थेट द्यावा

- ऊस तोडणी या रोजगारास शेड्यूल्ड एम्प्लॉयमेंन्टमध्ये समाविष्ट करावे. मजुरांना हार्वेस्टर यंत्रांप्रमाणे ४९९ रुपये प्रतिटन मजुरी द्यावी

- ऊसतोडणी व स्थलांतरित मजुरांसाठी स्वतंत्र कायदा माथाडी कायद्याप्रमाणे मंजूर करा

- ग्रामपंचायतींद्वारे ऊसतोड मजुरांची नोंदणी करा

- ऊसतोडणी मजुरांकडील थकीत उचल रकमेचे संस्थागत कर्जात रूपांतर करा

- जिंतूर (परभणी) तालुक्यातील आंध आदिवासी मजूर माणिक घोगरे यांच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगारांना तत्काळ अटक करा. तसेच गोसावी पांगरी (ता. मंठा) येथील प्रकरणात गुन्हा दाखल करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com