Sugarcane FRP : राज्यातील किती साखर कारखान्यांनी थकविली एफआरपी?

Team Agrowon

एफआरपी दिली नाही

राज्यात चालू ऊस गळीत संपून तब्बल दोन महिने झाले, तरीही राज्यातील निम्म्या साखर कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली नाही.

Sugarcane FRP | Agrowon

किती थकीत एफआरपी?

कारखान्यांनी शेतकऱ्यांची थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल १२ हजार ४०० कोटी रुपये थकवले आहेत.

Sugarcane FRP | Agrowon

साखर आयुक्तांची नोटीस

१५ मेपर्यंत ६० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या ९ साखर कारखान्यांना साखर आयुक्तांनी नोटीस काढली आहे.

Sugarcane FRP | Agrowon

उच्चांकी गाळप

राज्यात ऊस गळीत नुकताच संपला आहे. दरवर्षीपेक्षा यंदा ऊसाचे उच्चांकी गाळप झाले असून उताराही चांगला आहे.

Sugarcane FRP | Agrowon

साखरेचे भाव वाढले

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव वाढले असतानाही अनेक कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची एफआरपी दिली नाही.

Sugarcane FRP | Agrowon

ऊस उत्पादक

राज्यातील २१० साखर कारखानदारांनी १५ मे पर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीचे ३२ हजार २३० कोटी दिले आहेत.

Sugarcane FRP | Agrowon

एकूण किती देय एफआरपी?

एकूण देय एफआरपीच्या ९६.२ टक्के आहे. अद्यापही कारखान्यांकडे एफआरपीचे १२ हजार ४०० कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.

Sugarcane FRP | Agrowon

संपूर्ण एफआरपीची रक्कम

एप्रिलपर्यंत राज्यातील एकूण २१० कारखान्यांयांपैकी केवळ १०५ कारखान्यांनी संपूर्ण एफआरपीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा केली.

Sugarcane FRP | Agrowon
Animal Vaccination | Agrowon