Fodder Management : चाऱ्याचे हवे योग्य नियोजन

वसायिक बांधकामांमुळे गावात आणि शहरात जनावरांसाठी राखीव ठेवलेले गायरान क्षेत्र कमी होत चालले आहे.
Fodder Management
Fodder ManagementAgrowon

कृषिपंडित सुरेश पाटील

व्यवसायिक बांधकामांमुळे (Commercial Construction) गावात आणि शहरात जनावरांसाठी राखीव ठेवलेले गायरान क्षेत्र (Grazing Land) कमी होत चालले आहे. नदीकाठच्या गावांना पूर येतो. त्यामुळे नदीच्या बाजूने असणारे चारा क्षेत्र (Fodder Area) पूर बाधित होऊन पुढील कित्येक दिवस चाऱ्यांची कमतरता (Fodder Shortage) येते. काही ठिकाणी नियमित पडणाऱ्या दुष्काळामुळे चाऱ्याची कमतरता तयार होते.

Fodder Management
Farmer Life : अॅग्रोवनचा प्रतिनिधीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत

देशातील काही भागात ऊस तोडणी चालू झाली की पशुपालकांची चाऱ्याची मुख्य मदार राहते ती ऊस वाड्यांवर, पण अलीकडच्या काही वर्षात ऊस तोडणीसाठी मशीनचा वापर होत असल्याने तिथेही चारा कमी प्रमाणात मिळत आहे. शिवाय हिरव्या चाऱ्यापासून जैव इंधन निर्मिती हा एक पर्याय आता समोर येतोय तेव्हा चाऱ्याचा प्रश्न आणखीन गंभीर होत जाईल.

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे हमखास पशुधन आहे पण चाऱ्यासाठी नियोजित जमीन असावी अशी शेतकरी, पशुपालकांची इच्छा नाही. त्यामुळे हंगामात मिळेल त्या चाऱ्यापासून जनावरांची भूक भागवून न्यायची, हीच मानसिकता सर्वत्र पाहावयास मिळते आहे.

जास्तीत जास्त चाऱ्याचे टनेज आणि पोषणमूल्यांनी युक्त अशा नवनवीन जातींच्या चाऱ्याची लागवड आपल्या प्रक्षेत्रावर पशुपालकांनी करायला हवी. त्यामुळे पशुपालनात होणाऱ्या चाऱ्याच्या खर्चावर बचत तर होईलच शिवाय गुणवत्तापूर्वक चारा योग्य वेळेत आपल्याला उपलब्ध होईल.

Fodder Management
Crop Cover : क्रॉप कव्हरचा वापर

खरीप आणि रब्बी हंगामानंतर मुख्य पिकांच्या मळणीनंतर वाया जाणारे अवशेष जसे की गहू, हरभरा यांचे काड, भाताचे पिंजर, ज्वारी, बाजरीचा कडबा यावर योग्य ती प्रक्रिया करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून वर्षभर शुष्क चारा हिरव्या चाऱ्यासोबत वापरता येईल. हंगामात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त हिरव्या चाऱ्यापासून मुरघास सुद्धा बनवता येईल आणि असा मुरघास पुढे वर्षभर किती तर दिवस वापरता येईल.

चारा उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकारने ''एफपीओ''जरी स्थापन करणार अशी घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात चारा उत्पादन शेतकऱ्याला त्याच्या बांधावरतीच घ्यावा लागेल. मानवाला जशी अन्नधान्याची नासाडी परवडणारी नाही आहे तशीच हिरव्या आणि वाळलेल्या चाऱ्याची नासाडी येथून पुढे पशुपालकांना सुद्धा परवडणारी नक्कीच नाही.

त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या पशुधनाच्या तुलनेत वर्षभर हवा असणारा चारा वर्षाच्या सुरुवातीस योग्य पद्धतीने साठवणे गरजेचे आहे. माणसाला आज भूक लागली तर आजच अन्न (भाकरी) मिळू शकते. परंतु जनावरांना चाऱ्यांसाठी किमान तीन ते चार महिने आपल्या शेतात चारा येण्यासाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे चाऱ्याचे योग्य नियोजन केले तरच तो वेळेवर उपलब्ध होतो.

- कृषिपंडित सुरेश पाटील, बुदिहाळ जि. बेळगाव. (९७४१६२१६५०)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com