Sugarcane Production : आधुनिक तंत्रज्ञानाने एकरी २०० टन उत्पादन शक्य

Agriculture Modern Technology : अचूक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व ऊस उत्पादनवाढीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास शेती फायद्याची होऊ शकते.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : अचूक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये व ऊस उत्पादनवाढीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास शेती फायद्याची होऊ शकते. अशा पद्धतीतून एकरी २०० टन ऊस उत्पादन सहज शक्य आहे, असे प्रतिपादन कालवडे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नीलेश मालेकर यांनी केले.

शिरोळ येथील श्री दत्त कारखान्यामार्फत ‘झेप २०० टन’ योजनेत सहभागी सभासदांना ‘जमिनीतील अन्नद्रव्ये व उत्पादनवाढीचे आधुनिक तंत्रज्ञान’ या विषयी मेळावा घेण्यात आला. त्या वेळी डॉ. मालेकर बोलत होते. श्री दत्तचे अध्यक्ष, उद्यानपंडित गणपतराव पाटील अध्यक्षस्थानी होते.

Sugarcane
Sugarcane Season : पावसाने दडी मारल्याने गळीत हंगाम धोक्यात

शाश्वत ऊस शेतीसाठी शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागतीपासून सेंद्रिय कर्ब, लागण पद्धत, ऊस वाढीच्या दृष्टिकोनातून समतोल आहारामध्ये रासायनिक व जैविक खते वापरण्याची पद्धत, आळवणी, फवारणी व फवारणीतून देण्यात येणारी आधुनिक खते याबरोबरच पाचट कसे ठेवावे याबाबतचे मार्गदर्शन डॉ. मालेकर यांनी केले.

Sugarcane
Sugarcane Management : उसाचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे...

गणपतराव पाटील म्हणाले, की सुपर केन नर्सरीची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी स्वतःची रोपवाटिका तयार केली पाहिजे. खत, पाणी, अन्नद्रव्य यांचे व्यवस्थापन समजून घेऊन सेंद्रिय कर्ब वाढवण्याच्या दृष्टीने काम केल्यास पुढील पिढीला आपण चांगली शेतजमीन देऊ शकतो.

‘माती परीक्षणावर आधारित ऊस शेती’ विषयी ए. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी जमीन सुपिकतेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. अरुण देसाई, संचालक शेखर पाटील, महेंद्र बागी, प्रमोद पाटील, विलास माने आदी उपस्थित होते. चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केले. अमर चौगुले यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com