Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी

Latest Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी (१ सप्टेंबर) रात्रीपासून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसास सुरुवात झाली.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारी (१ सप्टेंबर) रात्रीपासून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसास सुरुवात झाली. पुणे शहरात चांगलाच जोर असला तरी ग्रामीण भागात कमी-अधिक सरी पडल्या. त्यामुळे खरिपातील पिकांना काहीसा दिलासा मिळाल्याने वाढीच्या अवस्थेतील पिकांना आधार मिळाला आहे.

यंदा खरीप हंगामात एक लाख ९५ हजार ७१० हेक्टरपैकी एक लाख ७१ हजार २४५ हेक्टर म्हणजेच ८८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत असताना गेल्या एक महिन्यापासून पुणे जिल्ह्यात पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके सुकून चालली होती. काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पावसाअभावी वाढ खुंटली आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

Rain Update
Artificial Rain : कहाणी कृत्रिम पावसाची!

हवामान विभागाने गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी पावसाचा अंदाज दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळपासून वातावरणात बदल झाला. शनिवारी (२ सप्टेंबर) सकाळपासून अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडला. या पावसामुळे दिवसभर ढगाळ वातावरण असून पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुक्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली.

त्यामुळे भात पिकांना चांगलाच दिलासा मिळाल्याने भात पिके चांगलीच तरारली आहेत. पूर्व भागातील तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होते. हवेली, मावळ, बारामती, पुरंदर, मुळशी तालुक्यांत अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. तर, भोर, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, दौंड तालुक्यात पावसाच्या काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.

Rain Update
Artificial Rain : नेमका कसा पाडला जातो कृत्रिम पाऊस?

शनिवारी (२ सप्टेंबर) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिलीटरमध्ये)

हवेली - पुणे वेधशाळा, केशवनगर २०.५, थेऊर २५.५, उरुळीकांचन २०.५, भोसरी १८.५, चिंचवड ५३.३, वाघोली २५.५, मुळशी - माले ३७.८, मुठे ११.५, मावळ - वडगाव मावळ १६, काले ३९.५, कार्ला १८, लोणावळा १००.५, खेड - पाईट २४.३, चाकण २३.८, आळंदी १८.५, शिरूर - वडगाव, न्हावरा १८.३, बारामती - बारामती १०.३, माळेगाव ३५, पणदरे ४३.३, लोणी १२.८, उंडवडी ३८.८, इंदापूर - सणसर १९.८, दौंड - यवत १८.३, कडेगाव २८.८, वरवंड १८.३, पुरंदर - सासवड २२, भिवंडी ११.५, कुंभारवळण ५१.८, राजेवाडी ३३.८, वाल्हा १४.३.

धरणक्षेत्रात पावसाचा दिलासा

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील लोणावळा घाटमाथ्यावर १०५ मिलिमीटर पाऊस पडला. तर ठोकरवाडी, वळवण या घाटमाथ्यांवरही मध्यम पाऊस पडला. चासकमान धरणाच्या क्षेत्रात सर्वाधिक ५० मिलिमीटर पाऊस पडला. तर कासारसाई धरणक्षेत्रात ३७ मिलिमीटर, तर पवना २०, वडिवळे १५, नाझरे १३, मुळशी धरणात १६ मिलिमीटर पाऊस पडल्याने गेल्या चोवीस तासामध्ये धरणांमध्ये ०.५२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com