Katraj Milk : कात्रज मिल्क पार्लरसाठी महिला वितरकांना प्राधान्य

दूध-पेढे-बर्फी ते फरसाण आणि भाजीपालाही असे सर्वांगाने पूर्ण असे कात्रज पार्लर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरात आणि परजिल्ह्यात करण्याचा निर्णय कात्रज संघाने घेतला आहे.
Katraj Milk
Katraj MilkAgrowon
Published on
Updated on

शिक्रापूर, जि. पुणे ः दूध-पेढे-बर्फी ते फरसाण आणि भाजीपालाही (Vegetables) असे सर्वांगाने पूर्ण असे कात्रज पार्लर (Katraj Milk Parlor) जिल्ह्यातील प्रत्येक गावात, शहरात आणि परजिल्ह्यात करण्याचा निर्णय कात्रज संघाने घेतला आहे. महिलांना उद्योजक (Women Entrepreneurs) करण्यासाठी प्रत्येक गावात महिलांना वितरक (Women Milk Distributors) होण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी महिलांनी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन कात्रज दूध संघाच्या (Katraj Milk Association) अध्यक्षा केशरताई पवार यांनी केले.

Katraj Milk
`कात्रज डेअरी`च्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी अकरा जागांसाठी २५ उमेदवार आखाड्यात

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार व माजी सभापती प्रकाश पवार यांच्या पुढाकाराने जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथे मोफत आरोग्य तपासणी उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पवार म्हणाल्या, ‘‘कात्रज दूध संघाच्या वतीने १५ प्रकारच्या मिठाई, मसाला ताक, पेढे ही कात्रज डेअरीची खासियत असून लवकरच फरसाणही आम्ही जिल्ह्यातील आमच्या ४५५ मिल्क पार्लरच्या माध्यमातून बाजारात आणत आहोत. या शिवाय ताजा भाजीपालाही या पार्लरमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. अत्यल्प ठेव रकमेवर ही केंद्रे गावागावात आर्थिक परिवर्तन करतील असा आमचा उद्देश आहे. यासाठी महिलांना प्राधान्य असून आमच्याशी तत्काळ संपर्क साधावा,’’ असे आवाहन त्यांनी केले.

Katraj Milk
कात्रज सहकारी दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

या उपक्रमासाठी उपाध्यक्ष राहुल दिवेकर, सीईओ संजय कालेकर यांच्यासह सर्व संचालक तसेच माजी सभापती प्रकाश पवार यांचे उत्तम पाठबळ असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

शिबिरासाठी उद्योगपती सदाशिवराव पवार, सरपंच किशोर खळदकर, उपसरपंच गणेश उमाप, अलका होळकर, राहुल पवार, सुमन क्षीरसागर, शोभा इंगवले, ग्रामसेविका निर्मला खेडकर, रमेश पलांडे, बजाबा इंगवले आदींसह डॉ.अजिंक्य तापकीर, डॉ. पवन सोनवणे व त्यांचे वैद्यकीय पथक उपस्थित होते.

‘एक महिला एक कुटुंब चालवेल हा उद्देश...!’

‘एका महिलेला तिचे संपूर्ण कुटुंब चालविता येईल इतके उत्पन्न आमचे मिल्क पार्लर मिळवून देईल अशी व्यवस्था आम्ही केली आहे. तसेच, १५ ते ३० टक्के इतका नफा या उप्तादनांमध्ये मिळेल व ग्राहकही समाधानी होतील अशी आमची या संकल्पनेमागची योजना असल्याने महिलांनी तत्काळ संपर्क साधावा,’’ असे आवाहन सौ. केशरताई पवार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com