Udhhav Thackeray: शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती

संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) युती करण्याच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन समीकरण उदयाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Shivsena & Sambhaji Brigade
Shivsena & Sambhaji BrigadeAgrowon

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना (Shivsena) युती करणार असल्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकारपरिषदेत केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे उपस्थित होते. शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) युती करण्याच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन समीकरण उदयाला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, संभाजी ब्रिगेडचे गंगाधर बनबरे, सौरभ खेडेकर, प्रदीप गाजरे उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड सर्व स्तरावरील निवडणूक लढवणार आहे. शिवसेना हा समविचारी, पुरोगामी पक्ष असल्याने त्यांच्याशी युती करत आहोत, असे मनोज आखरे यांनी सांगितले.

दरम्यान पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे यांनी 'लढवय्या सहकाऱ्यांचे स्वागत करतो, असा उल्लेख केला. प्रादेशिक अस्मिता तसेच लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली असल्याचे ठाकरे म्हणाले.

सध्या देशभरातील प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकणारे लोक बेताल झाले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ठाकरे म्हणाले. आजवरचा मराठी माणसांचा म्हणा, मराठ्यांचा म्हणा जो इतिहास आहे मग तो दुहीचा इतिहास आहे हाच आपल्याला गाडत आलेला आहे. आपण एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू, दुहीच्या शापालाच गाडून टाकू.

दुहीचा शाप आजवर आमचा घात करत आला, असे ठाकरे म्हणाले. औरंगजेबाने सांगितले होते की, मराठ्यांच्या शौर्यात जगाच्या पाठीवर तोड नाही. पण या भूमीत दुहीची बीजं खडकावर जरी फेकली तरी ती इतकी रुजतात किंवा फोफावतात की ही तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपल्या शत्रूलाही कळले होते. आमची जी काही भूमिका आहे ती रोखठोक आहे, असे ते म्हणाले.

ही युती काही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. ही वैचारिक युती आहे. लवकरच राज्यात संयुक्त मेळावे घेणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com