Fraud With Farmer : डाळिंब खरेदीत १३ लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक

Pomegranate Procurement : सुमारे दोन वर्षांपूर्वी शहरातील फळविक्रेता मोहसीन सय्यद याच्याकडून सुमारे १३ लाख रुपयांचे डाळिंब खरेदी करून नेले होते.
Pomegranate
PomegranateAgrowon
Published on
Updated on

Nashik News : शहरातील फळ व्यापाऱ्यांकडून डाळिंब खरेदी करून सुमारे १३ लाखांची फसवणूक करणाऱ्या बागवान नावाच्या संशयिताला शहर पोलिसांनी सागवान (जि. बुलडाणा) येथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत.

शेख अमजद शेख मोहम्मद बागवान (वय ३३, रा. सागवान, ता. जि. बुलडाणा) असे या संशयिताचे पूर्ण नाव असून, त्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी शहरातील फळविक्रेता मोहसीन सय्यद याच्याकडून सुमारे १३ लाख रुपयांचे डाळिंब खरेदी करून नेले होते.

Pomegranate
Pomegranate Export : या देशांत होते भारतीय डाळिंबाची निर्यात

त्यानंतर मोहसीन सैय्यद यांनी वारंवार पैसे मागितले असता, बागवान याने देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देत होता. यामुळे त्रस्त झालेल्या सैय्यद यांनी येवला शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. तर, बागवान हा गुन्हा घडल्यापासूनच फरारी होता.

Pomegranate
Pomegranate Production : गुणवत्तापूर्ण डाळिंब उत्पादन शिकावे महाराष्ट्राकडूनच

गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून शहर पोलिसांनी बागवान याला ताब्यात घेतले आहे. त्याला येथील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष उपस्थित केले असता, न्यायालयाने सोमवार (ता. १९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सूरज मेढे, हवालदार दीपक शिरुडे, बाबा पवार, मनिषा खांडेकर, मोबाईल सेलचे हेमंत गिलबिले यांनी ही कारवाई केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com