Pollution : गुऱ्हाळातील प्लॅस्टिक वापरामुळे प्रदूषणात भर

पारगाव येथील काही गुऱ्हाळांमध्ये गुळात भेसळ केली जात असून, इंधन म्हणून प्लॅस्टिक जाळले जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.
Pollution
PollutionAgrowon

केडगाव, जि. पुणे ः पारगाव येथील काही गुऱ्हाळांमध्ये गुळात भेसळ (Jaggery Adulteration) केली जात असून, इंधन म्हणून प्लॅस्टिक (Plastic Pollution) जाळले जात असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण (Pollution) होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात संभाजी ब्रिगेडने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यामुळे गुऱ्हाळमालक व चालक यांचे धाबे दणाणल्याने त्यांनी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली. यानंतर झालेल्या बैठकीत भेसळ आणि प्लॅस्टिक जाळणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Pollution
Organic Jaggery : सेंद्रिय गूळ, हळदीचा तयार केला ब्रॅण्ड

पारगाव येथे एकाच गावात ४० गुऱ्हाळे आहेत. यातील बहुतांश गुऱ्हाळे ही परप्रांतीयांची आहेत. प्रत्येक गुऱ्हाळघरात २५ ते ३० मजूर काम करतात. पारगावचे अर्थकारण या गुऱ्हाळांवर अवलंबून आहे. या ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणावर जाळला जात होता. तर, गुळात भेसळदेखील होत असल्याच्या आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. तसेच आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर गुऱ्हाळचालकांनी बैठक घेऊन, गुळात भेसळ करणार नाही आणि इंधन म्हणून प्लॅस्टिक कचरा जाळणार नाही, अशी ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली आहे.

Pollution
Pollution : कोंडलेला ‘श्‍वास’

या सर्व प्रकरणावर चर्चा करण्यासाठी पारगाव येथे गुऱ्हाळमालक व आंदोलनकर्ते यांच्यात रविवारी (ता.१८) बैठक घेण्यात आली. या वेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने माजी उपसरपंच संभाजी ताकवणे म्हणाले, ‘‘प्रदूषणामुळे फळभाजीपाला उगवत नाही. गुऱ्हाळघरांना आमचा विरोध नाही. परंतु गुळात भेसळ आणि प्रदूषण थांबले तर आमची काहीच हरकत नाही.’’ या दोन्ही मुद्द्यांवर सर्वच गुऱ्हाळचालक व मालकांचे एकमत झाले.

गुऱ्हाळ मालकाच्या वतीने बोलताना दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सयाजी ताकवणे आणि माजी उपसरपंच सोमनाथ ताकवणे म्हणाले, ‘‘पारगाव विकासात गुऱ्हाळघरांचा मोठा वाटा आहे. गुऱ्हाळ नसते तर ऊस उत्पादकांचे हाल झाले असते. त्यामुळे ती बंद करून चालणार नाही. गुऱ्हाळ उभे करताना त्यात शेतकऱ्याची मोठी गुंतवणूक झालेली आहे. भेसळ आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टींच्या विरोधात आम्ही आहोत. गुऱ्हाळातील अनिष्ट प्रथांचा सर्वांना त्रास होत आहे हे आम्हाला मान्य आहे. त्यामुळे भेसळ व प्रदूषण यापुढे होणार नाहीत,’’ असे आश्‍वासन त्यांनी दिले.

या वेळी सुभाष बोत्रे, सुरेश ताकवणे, लक्ष्मण ताकवणे, नानासाहेब जेधे, श्याम ताकवणे, रामकृष्ण ताकवणे, विजय चव्हाण, एकनाथ शेळके, नामदेव काळे, धनाजी ताकवणे, संभाजी ब्रिगेडचे स्वरूप ताकवणे, ज्ञानेश्वर भोगावडे, विकास ताकवले, गणेश ताकवणे, वैभव बोत्रे उपस्थित होते.

प्लॅस्टिक जाळल्यास १० हजार रुपयांचा दंड

सरपंच जयश्री ताकवणे यांनी गुऱ्हाळावर प्लॅस्टिक कचरा सापडल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com