Dilip Walse Patil : ‘व्हीएसआय’चा राजीनामा देण्यापासून पवारांनी रोखले

Maharashtra Cooperation Minister : वसंतदादा साखर संस्थेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी (ता. १२) संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि वळसे पाटील एकत्र आले होते.
Dilip Walse Patil
Dilip Walse PatilAgrowon
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर मी वसंतदादा साखर संस्थेच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार होतो, पण मला शरद पवार यांनी राजीनामा देण्यापासून परावृत्त केल्याचा गौप्यस्फोट सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

वसंतदादा साखर संस्थेत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी (ता. १२) संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि वळसे पाटील एकत्र आले होते.

Dilip Walse Patil
VSI Awards : ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

वळसे पाटील म्हणाले, ‘‘राजीमाना देण्याचा प्रश्‍न व्यक्तिगत आहे, पण मला काम करायला सांगितले ही गोष्ट खरी आहे. आम्ही पवारांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते होते आणि राहतील. पवारांसोबतच्या आजच्या कार्यक्रमात कोणताही अवघडलेपणा नव्हता,’’ असेही ते म्हणाले.

या चर्चासत्रासाठी सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी उपस्थित होते. याच वेळी चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे लोकार्पण असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे उपस्थित होते.

Dilip Walse Patil
VSI In Nagpur : ‘व्हीएसआय’च्या नागपूर केंद्राचे कामकाज ऑगस्टपासून

केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सहकार कायद्यात बदल करण्यासाठी एक मसुदा तयार केला जात असून, यासंदर्भात शरद पवारांची चर्चा करणार आहोत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

‘...म्हणून अजित पवार अनुपस्थित’

‘‘राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे आयोजित चर्चासत्र पूर्णपणे अराजकीय स्वरूपाचे होते. त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ‘व्हीएसआय’ऐवजी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची ही बैठक असल्याने कदाचित अजित पवार अनुपस्थित राहिले,’’ असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com