Floriculture : पवना फूल उत्पादक संघाचा दिल्लीत सन्मान

संरक्षित फुलशेतीमधील उल्लेखनीय कार्याबद्दल मावळातील पवना फूल उत्पादक संघाचा दिल्लीत गौरव करण्यात आला.
Pawna Flower Producer Union
Pawna Flower Producer UnionAgrowon

Floriculture पुणे : संरक्षित फुलशेतीमधील (Flower Farming) उल्लेखनीय कार्याबद्दल मावळातील पवना फूल उत्पादक संघाचा (Pawna Flower Producer Union) दिल्लीत गौरव करण्यात आला.

नवी दिल्लीतील ट्रस्ट फॉर अॅडव्हान्समेंट इन अॅग्रिकल्चरल सायन्सेसतर्फे (Trust For Advancement Sciences) पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, सीमा ठाकर यांना भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. टी. महापात्रा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याबद्दल मावळ तालुक्यातील फूल उत्पादकांकडून कौतुक होत आहे.

ट्रस्ट फॉर ॲडव्हान्समेंट इन अॅग्रिकल्चरल सायन्सेस, नाबार्ड, अपेडा, आसीएआर, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांनी ‘भारतीय फ्लोरिकल्चरच्या संभाव्यतेचा उपयोग’ यावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला.

Pawna Flower Producer Union
Floriculture : पुष्पोत्पादनाला प्रोत्साहनासाठी पंचवार्षिक योजनेची आखणी

त्या वेळी परिषदेचे माजी महासंचालक डॉ. आर. एस परोडा, फलोत्पादन विभाग उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग, भारत सरकारचे फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार, डॉ. एन. के. दादलानी आणि पुण्यातील पुष्प संशोधन संचालनालय संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकार हे गटशेतीस प्राधान्य देत असून, देश व राज्यात शेतकऱ्यांचे गट शेतीतून आर्थिक सबलीकरण व्हावे, यासाठी शेतकरी संघ, शेतकरी कंपन्या उभ्या केल्या जात आहेत.

Pawna Flower Producer Union
Floriculture : शेवंतीच्या शेतात 'एलईडी'चा प्रकाश

याच अनुषंगाने मावळ तालुक्यातील पवनानगरच्या (येळसे) काही तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पवना फूल उत्पादक संघ स्थापन केला. फुलशेतीमध्ये पथदर्शी कार्य करून राज्य व केंद्र सरकारपुढे एक आदर्श निर्माण केला. याचीच दखल घेत या संस्थेने घेतली आहे.

दरम्यान, या वेळी प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालणे, प्लॅस्टिकवरील आयात कर वाढविणे व भारतातील फुले निर्यात करताना निर्यातक्षम फुलांवर लादण्यात आलेला जीएसटी कर बंद करणे, आयात-निर्यात मालावरील वाहतूक दर कमी करणे आदी विषयांवर चर्चा झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com