Floriculture : पुष्पोत्पादनाला प्रोत्साहनासाठी पंचवार्षिक योजनेची आखणी
पुणे ः ‘‘शेतकऱ्यांना फळे-भाजीपाल्यांशिवाय (Vegetable) इतर कृषी उत्पादनांचा (Agriculture Production) प्रभावी पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी पुष्पोत्पादनाला (Floriculture) प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार पंचवार्षिक योजना (Scheme For Flower Farming) आखत आहे. या योजनेत विविध फुलांच्या नवनवीन वाणांचे संशोधन (Flower Verity Research), विकास, प्रक्रिया आणि निर्यातीवर भर राहील. यासाठी क्लस्टरनिहाय विकास केला जाईल,’’ अशी माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी यांनी दिली.
डॉ. लिखी यांनी केंद्र सरकारच्या विविध कृषी संशोधन संस्थांना भेटी दिल्या. यामध्ये त्यांनी पुष्पसंशोधन संचालनालयाला भेट देऊन आढावा घेतला. संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी झालेल्या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे राष्ट्रीय फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार उपस्थित होते.
डॉ. लिखी म्हणाले, ‘‘फुलांचा वापर आता केवळ धार्मिक आणि घरगुती वापरासाठी राहिलेला नाही. सजावटीसह उद्योग म्हणून वापर वाढला आहे. देशात वाढणाऱ्या फुलशेतीच्या विकासाठी पंचवार्षिक योजना आखली जात आहे. यासाठी क्लस्टरनिहाय विकास केला जाईल.’’
डॉ. प्रसाद म्हणाले, ‘‘फुलांना आणि फुलशेतीला अन्नधान्य, फळे आणि भाजीपाल्याच्या शेतीसारखा दर्जा मिळाला पाहिजे. दिवसेंदिवस विविध फुलांना मागणी वाढत आहे. निर्यातीसाठी देखील मागणी होत आहे. यासाठी विविध सजावटीच्या, सुगंधाच्या आणि नैसर्गिक रंगाच्या फुलांच्या वाणांच्या संशोधनाचे काम संचालनालयाद्वारे सुरू आहे. फुलशेती बरोबरच लॅन्डस्केपिंग, नर्सरी उद्योग, आणि व्हर्टिकल गार्डन असे नवीन प्रकार येत आहेत. ही नावीन्यपूर्ण क्षेत्रे शेतकऱ्यांना खुणावत आहेत. ’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.