Milk Adulteration : भेसळीचा संशय असलेले २२०० लिटर दूध नष्ट

Milk Production : नगर जिल्ह्यात दूध भेसळीचा मुद्दा सातत्याने समोर येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील दूध भेसळीचे प्रकार उघड झाल्यानंतर कारवाईच्या भीतीने भेसळ बंद झाली आणि सुमारे एक लाख लिटर दुधात घट झाली.
Milk Adulteration
Milk AdulterationAgrowon
Published on
Updated on

Nagar News : पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील विनापरवाना सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रावर जिल्हास्तरीय दुग्ध तपासणी समितीने धाड टाकून तेथे खरेदी केलेले दूध भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून समितीसह अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दोन हजार दोनशे लिटर दूध नष्ट केले. मंगळवारी (ता. २५) ही कारवाई केली. शिवाय श्रीगोंदा तालुक्यातील तीन दूध संकलन केंद्रांतील दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले.

नगर जिल्ह्यात दूध भेसळीचा मुद्दा सातत्याने समोर येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील दूध भेसळीचे प्रकार उघड झाल्यानंतर कारवाईच्या भीतीने भेसळ बंद झाली आणि सुमारे एक लाख लिटर दुधात घट झाली.

दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दूध भेसळीबाबत कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दूध भेसळीला प्रतिबंध घालण्यासाठी नगर येथे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली कारवाईसाठी जिल्हास्तरीय समिती करण्यात आली आहे.

Milk Adulteration
Milk Rate : दूध दरवाढ धोरणामुळे दूध उत्पादकांचा तोटाच

अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, दुग्धविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली आणि धडक मोहिमेद्वारे दूध भेसळीवर कारवाईची तसेच यात सहभाग असलेल्या, दूध खरेदी करणाऱ्या व्यक्ती व संस्थावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

समितीला मिळालेल्या माहितीनुसार पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील विनापरवाना सुरू असलेल्या दूध संकलन केंद्रावर परवाना नसलेल्या जय हनुमान दूध संकलन केंद्रावर धाड टाकून तपासणी केली असता तेथे खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाची तपासणी केली जात नव्हती. केंद्राच्या परिसरात सर्वत्र घाण होती. तसेच दूध भेसळ असल्याच्या संशयावरून ७७ हजार रुपये किमतीचे २२०० लिटर दूध नष्ट केले.

Milk Adulteration
Milk Fat : दुधातील फॅट, एसएनएफ कमी होण्याची कारणे अन् उपाय

सात दिवसांनी दिली माहिती

पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथे भेसळ झाल्याच्या संशय असलेले २२०० लिटर दूध अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नष्ट केल्याची कारवाई २५ जुलै रोजी करून सात दिवसांचा कालावधी उलटला. सात दिवस या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आली व रविवारी (ता. ३०) रात्री कारवाईबाबतचे प्रसिद्धीपत्रक दिले.

दूध नष्ट केले, मात्र जर दूध भेसळ असेल तर खरेदीदारावर काय कारवाई केली हे मात्र पत्रकात नमूद केले नाही. नगर जिल्ह्यात प्रशासनातील कोणत्याही विभागाने कारवाई अथवा अन्य कोणतीही माहिती तातडीने विनाविलंब दिली जात असताना अन्न व औषध प्रशासनाने ही माहिती सात दिवस का दडवली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com