Paneer Adulterated : पनीरमधील भेसळ कशी ओळखाल? 'या' ठिकाणी करा तक्रार

sandeep Shirguppe

पनीर भाजीला सर्वाधिक पसंती

घरातील स्वयंपाकापासून, हॉटेल, ढाबा, या सर्वच ठिकाणी आपण पनीरच्या भाजीला सर्वाधिक पसंती देतो. यामुळे पनीरची भाजी ही सर्वाधिक आवडती मानली जाते.

Paneer Adulterated | agrowon

पनीरमध्ये भेसळ

दरम्यान पनीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या भेसळीमुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भीती असते.

Paneer Adulterated | agrowon

शुद्ध पनीर ओळखा

मुळात पनीरमध्ये केली जाणारी भेसळ ओळखू येत नसल्याने अनेकांची फसवणूक होते. यामुळे आपण खात असलेले पनीर भेसळयुक्त आहे की चांगले हेच समजत नाही.

Paneer Adulterated | agrowon

भेसळयुक्त पनीर रबरासारखे

भेसळयुक्त पनीर ओळखायचे असेल तर ते रबरासारखे लागते. याचबरोबर शुद्ध पनीर चिकट असते तुम्ही खात असलेल्या पनीरला चिकटपणा नसेल तर त्यात भेसळ आहे हे समजून जावे.

Paneer Adulterated | agrowon

मऊ न होणारे पनीर भेसळ

भेसळयुक्त पनीर लगेच शिजत नाही, ते मऊ होत नाही. या पनीरमध्ये दुधाचा येणारा चविष्ठ वास येत नाही.

Paneer Adulterated | agrowon

असे ओळखा पनीर

उकळलेल्या पाण्यात आयोडिन टिचरचे थेंब टाकून त्यात पनीरचा तुकडा टाका. जर पनीरचा रंग बदलला तर नक्कीच यात भेसळ आहे हे ओळखता येईल.

Paneer Adulterated | agrowon

तक्रार करा

एखाद्यावेळेस जर पनीरमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले तर यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करता येऊ शकते.

Paneer Adulterated | agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात मोठी कारवाई

कोल्हापूर जिल्ह्यात २०२२-२३ या एका वर्षात ४ लाख ८१ हजार १६० रुपयांचे तब्बल १७८७ किलो पनीर अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त करण्यात आले आहे.

Paneer Adulterated | agrowon

अन्न व औषध प्रशासनाकडून आवाहन

अन्नपदार्थामध्ये अशी भेसळ आढळल्यास ग्राहकांनी तक्रार करावी. अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर विभागाचे सहायक आयुक्त तुषार शिंगाडे यांनी आवाहन केले.

Paneer Adulterated | agrowon
ujani dam | agrowon