Paddy bonus : सिंधुदुर्गातील भात उत्पादक बोनसच्या प्रतीक्षेत

यावर्षी भात खरेदी हंगाम अवघ्या दोन महिन्यावर आला असला तरी गेल्यावर्षीच्या हंगामातील भातविक्रीचा बोनस आजमितीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
Paddy
Paddy Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः यावर्षी भात खरेदी हंगाम (Paddy Procurement Season) अवघ्या दोन महिन्यावर आला असला तरी गेल्यावर्षीच्या हंगामातील भातविक्रीचा बोनस (Paddy Bonus) आजमितीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यातच शासनपातळीवर कोणताही सकारात्मक निर्णय देखील होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. बोनस मिळणार की नाही, असा सभ्रंम शेतकऱ्यांमध्ये आहे.

Paddy
Paddy procurement: तांदूळ, गहू खरेदीपोटी शेतकऱ्यांना 2.1 लाख कोटी रूपये

यावर्षीचा भातखरेदी हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात विक्रमी भात विक्री झाली. जिल्ह्यातील ३५ भातखरेदी केंद्रांवर ८९ हजार ८०० किव्टंल भातखरेदी झाली होती. शासनाने भातखरेदीचा दर प्रतिक्विंटल १ हजार ८६८ रुपये जाहीर केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात १६ कोटी ७७ लाख ४६ हजार रुपये जमा करण्यात आले. यापूर्वी शासनाने प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस दिला होता.

त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला असता, तरी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ कोटी २८ लाख ६० हजार रुपये जमा झाले असते. तशीच बोनसची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र यावर्षीचा हंगाम सुरू होण्यास अवघे काही महिने शिल्लक आहेत. तरीदेखील बोनस संदर्भात शासनपातळीवर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे बोनस मिळणार की नाही, असा प्रश्न भात उत्पादक विचारत आहेत. शासनाने बोनस लवकरात लवकर द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

गेल्या वर्षी ५० क्विंटल भाताची विक्री केली होती. प्रतिक्विंटल १८६८ प्रमाणे रक्कम मिळाली. मात्र अजूनही बोनसची रक्कम मिळालेली नाही. ही लवकरात लवकर मिळावी.-
अनंत मिराशी, भात उत्पादक शेतकरी, कोकिसरे, ता. वैभववाडी
शासनाने प्रतिक्विंटल १ हजार ७४० आणि ७०० रुपये बोनस असे एकूण २ हजार ४४० रुपये शेतकऱ्यांना गेल्या वर्षी दिले. या वर्षी प्रतिक्विंटलच्या रकमेत वाढ करून ती १ हजार ८६८ रुपये केले आहेत. बोनस मात्र दिला नाही. शासनाने शेतकऱ्यांना बोनस द्यावा. -
प्रवीण गायकवाड, अध्यक्ष, सहकारी सेवा संस्था खांबाळे, ता. वैभववाडी
शासनाकडून भाताची सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली आहे. बोनस संदर्भात कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. -
एन. डी. देसाई, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, सिंधुदुर्ग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com