Paddy Plantation : आधुनिक पद्धतीने भातलागवडीला पसंती

Kharif Paddy Plantation : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्या ओळखला जायचा, मात्र कालांतराने औद्योगिकीकरण व लहरी हवामानामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले.
Paddy Plantation
Paddy PlantationAgrowon
Published on
Updated on

Raigad News : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्या ओळखला जायचा, मात्र कालांतराने औद्योगिकीकरण व लहरी हवामानामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले. मुरूड कृषी विभागाकडून भात वाणाचे विविध प्रकार आणून उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांच्या कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित केले जात असून लागवडीसाठी सगुणा रिजनरेटिव्ह टेकनिक (एसआरटी) या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात आहे.

Paddy Plantation
Paddy Sowing : भात लागवडी पोहोचल्या ४९ टक्क्यांवर

कोकणात शेतकरी अल्‍प भूधारक असून उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्‍याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. सध्या जिल्ह्यात ९४, ५७३ हेक्टर भात लागवड क्षेत्र असून उत्पादकता प्रति हेक्टर २,६०० किलो इतकी आहे.

उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित भात लागवड पद्धतीचा अवलंब करण्यावर कृषी विभागाकडून भर दिला जात आहे. यांत्रिकीकरणामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत असल्‍याने जिल्ह्यात विकसित केलेली एसआरटीचा वापर केला जात असून भात पिकांसह कडधान्य पिकासाठी वरदान ठरण्याची शक्‍यता आहे.

Paddy Plantation
Paddy Plantation : रत्नागिरीत ५४ हजार हेक्टरवर भात लावण्या पूर्ण

नवीन तंत्रामुळे खर्चात बचत

एसआरटी तंत्राचा अवलंब केल्‍यास नांगरणी, चिखलणी, लावणी व निंदणी करावी लागत नाही. त्‍यामुळे ५० ते ६० टक्के खर्च कमी होतो. भातपिकामधील आवणी / लावणीचे कष्ट वाचल्यामुळे ५० टक्के त्रास कमी होतो.

चिखलणी करताना वाहून जाणाऱ्या सुमारे २० टक्के सुपीक मातीची धूप टाळता येते. गादी वाफ्यावरील रोपांची पाने रुंद व सरळ सूर्य प्रकाशाकडे झेपावत असल्‍याने उत्पादनात वाढ होते.

नांगरणी व मशागतीसाठी लागणाऱ्या व कर्ब निर्माण करणाऱ्या हजारो लीटर डिझेलची बचत होते. तसेच चिखलणीमुळे निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे उत्सर्जन टाळता येते. भातपीक ८-१० दिवस लवकर तयार होते. परिणामी उत्पादनात व उत्पन्नात निश्‍चित वाढ होते.

सगुणा पथकाने १९९९ ते २०११ अशी १२ वर्षे संशोधन करून एसआरटी तंत्र विकसित केले आहे. महाराष्ट्राच्या २७ जिल्ह्यांमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त शेतकरी या तंत्राचा अवलंब करून भातशेतीसह तृणधान्य, कडधान्ये आणि भाजीपाला पिके घेऊन किफायतशीर उत्पन्न घेत आहेत.
- चंद्रशेखर भडसावळे, एसआरटी तंत्राचे संशोधक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com