Paddy Sowing : भात लागवडी पोहोचल्या ४९ टक्क्यांवर

Paddy Farming : पुणे जिल्ह्यातील चित्र; पंधरा दिवसांत लागवडी उरकणार
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune Paddy Sowing : पुणे : जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे भात लागवडीला वेग आला आहे. आता काही ठिकाणी लागवडी अंतिम टप्यात असून, पुणे जिल्ह्याच्या भात पट्यात सरासरीच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी २९ हजार ७०६ हेक्टर म्हणजेच ४९ टक्के भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत भात लागवडी उरकण्याची शक्यता आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्यात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे रखडलेल्या भात लागवडीला वेग आला आहे. उशिरा का होईना पाऊस झाल्याने चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, मजुरांच्या टंचाई असताना इर्जिक पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडी केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने भात लागवडी केल्या आहेत.

जूनच्या अखेरीस जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात रोपे टाकण्यास सुरुवात केली होती. जवळपास २० ते २५ दिवसांत भात रोपे लागवडीस आली. त्यामुळे शेतकरी लवकरच चांगला पाऊस होईल म्हणून या आशेने शेतीकामांनी वेग घेतला होता. त्यातच १७ जुलैनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने या भात पट्ट्यातील तालुक्यात जोरदार पाऊस पडला. विशेषतः धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने भात खाचरे तुडुंब भरली होती. त्यातच नद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने धरणातील पाणीपातळीतही वाढ झाली आहे.


Paddy Farming
Paddy : जुलैच्या पावसामुळे भात लागवडी अंतिम टप्यात

भात क्षेत्रात विविध वाणांच्या लागवडी
दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी आंबेमोहोर, साळ, दोडकी, कोलम, इंद्रायणी या पारंपरिक भात बियाण्यांच्या लागवडी करत आहे. त्यासोबत कोकणी, पार्वती, फुले समृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी, व तृप्ती अशा संकरित विकसित भात बियाण्यांच्या वाणालाही मावळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पश्‍चिम खोऱ्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोलम आणि इंद्रायणी या भाताची मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या आहे. तर मावळसह भोर, मुळशी तालुक्यांत पारंपरिक चारसूत्री, अभिनव पट्टा पद्धत, एसआरटी व इतर पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी भात लागवडी केल्या जात आहे.तालुकानिहाय भात लागवडी (हेक्टरमध्ये)
तालुका --- सरासरी क्षेत्र -- भात लागवड -- टक्के
हवेली --- २०६४ --- ९०० -- ४४
मुळशी -- ७६६९ -- ४३९९ -- ५७
मावळ ---- १२,१२५ --- ७५७७ -- ६२
वेल्हे --- ५०१८ --- ३३०० -- ६६
जुन्नर --- ११,६२९ -- ३२२० -- २८
खेड --- ७२८६ -- ३४९६ -- ४८
आंबेगाव -- ५२४२ -- ३०९६ -- ५९
भोर -- ७३८३ --- ३५५० --- ४८
पुरंदर -- १२०८ --- १६८ -- १४
एकूण -- ५९,६२७ -- २९,७०६ --- ४९

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com