Nashi News : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या भात खरेदी घोटाळाप्रकरणी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी पुन्हा तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
शहापूर प्रकल्प कार्यालयाअंतर्गत खर्डी खरेदी केंद्रावरही भात खरेदीत अपहार झाल्याचे समोर आल्यावर प्रादेशिक व्यवस्थापक विजय गांगुर्डे, उपप्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड यांच्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बनसोड यांनी शहापूर उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे यांना दिले.
ठाणे, पालघर जिल्ह्यांत आदिवासी शेतकऱ्यांच्या नावाने व्यापाऱ्यांकडून भात खरेदीत दोन वर्षांत घोटाळा झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकर घोटाळ्यावर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सादर केली. त्यानंतर शासनाने बनसोड यांना चौकशी करण्याचे आदेश आले होते.
त्यानुसार बनसोड यांनी केलेल्या चौकशीत जव्हार, शहापूर या प्रादेशिक कार्यालयांमध्ये भात खरेदीत अनियमितता झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर बनसोड यांनी विजय गांगुर्डे, आशिष वसावे, अविनाश राठोड, गुलाब सदगीर यांचे निलंबन केले होते.
त्यानंतर गुन्हे दाखल झाले होते. खर्डी केंद्रावर अपहारप्रकरणी गांगुर्डे, राठोड, दीपाली सोनवणे, विविध कार्यकारी संस्था पळशीणचे अध्यक्ष पांडुरंग माडे, भरत घनगाव, गोकुळ राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश बनसोड यांनी दिले.
महामंडळाची व शासनाची आर्थिक फसवणूक
आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये उप प्रादेशिक कार्यालय शहापूरमधील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था पळशीण अंतर्गत खरेदी केंद्र, खर्डी येथे भात खरेदीमध्ये अनियमितता झाली असल्यामुळे सत्यता तपासण्यासाठी शिल्लक भाताच्या मोजणीकरिता पथक नियुक्त करण्यात आले होते.
त्यामध्ये संस्थेच्या खरेदी केंद्र खर्डी येथे हंगाम २०२२-२३ मधील साठेपुस्तकाप्रमाणे एकूण ५२,८४०.८८ क्विंटल भात गोदामामध्ये आढळून आला नाही. त्यामुळे महामंडळाची व शासनाची आर्थिक फसवणूक झाली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.