Orange Orchard : योग्य परिस्थितीतच संत्रा बागांचा ताण सोडावा

Citrus Crop : सध्याच्या स्थितीत ताणात असलेल्या बागांमध्ये बहारासाठी पोषक वातावरण निर्मिती म्हणजेच किमान तीन इंच पाऊस, तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि आर्द्रता ६५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तरच शेतकऱ्यांनी ताण सोडावा.
Mosambi Lagwad
Mosambi LagwadAgrowon
Published on
Updated on

Washim News : सध्याच्या स्थितीत ताणात असलेल्या बागांमध्ये बहारासाठी पोषक वातावरण निर्मिती म्हणजेच किमान तीन इंच पाऊस, तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि आर्द्रता ६५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तरच शेतकऱ्यांनी ताण सोडावा, असे आवाहन अखिल भारतीय लिंबूवर्गीय (फळे) प्रकल्पाचे समन्वयक तथा पंदेकृविचे शास्त्रज्ञ डॉ. दिनेश पैठणकर यांनी केले.

करडा कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी केव्हीकेचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे होते. वाशीम जिल्हा हा प्रमुख संत्रा उत्पादक जिल्हा म्हणून ओळख निर्माण करीत आहे. जिल्ह्यात जवळपास १२ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत संत्रा लागवड झाली आहे.

Mosambi Lagwad
Mosambi Disease : मोसंबीवरील ‘मंद ऱ्हास ‘ रोगाची लक्षणे काय आहेत?

यापैकी अंदाजे तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्र हे उत्पादनक्षम स्थितीत असून, बहुतांश शेतकरी हे मृग बहराचे उत्पादन घेत असतात. बऱ्याच शेतकऱ्यांना यामध्ये बहर व्यवस्थापनाबद्दल तांत्रिक प्रश्‍न निर्माण होतात. या वर्षी तर ताणाच्या अवस्थेत सतत सुरू असणाऱ्या अवकाळी पावसामुळे बरेच शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत.

त्या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचविण्याचा उपक्रम हातात घेण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून संत्रा पिकातील मृग बहर व्यवस्थापन विषयावर वेबिनारचे घेण्यात आला. शास्त्रज्ञ डॉ. पैठणकर यांच्यासह केव्हीकेचे उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

Mosambi Lagwad
Mosambi Crop: मोसंबी बागेची तहान कशी भागवावी?

ज्या बागांना अद्यापही अपेक्षित असा ताण बसलेला नसेल त्यांनी लिहोसिन दोन मिलि प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. निवृत्ती पाटील यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये शिफारशीत ९००, ३०० व ३०० या प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाशची मात्रा एकूण पाच हप्त्यांमध्ये विभागून द्यावी.

मायकोरायझा आणि इतर सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करावा. ताणाच्या अवस्थेतील आणि ताण सोडण्याच्या अवस्थेतील फुलधारणेच्या योग्य नियोजनाबद्दल आणि फवारण्यांबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी रवींद्र जटाळे (कारंजा) यांनी केले. मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत उलेमाले (रिसोड) यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com