Maharashtra Monsoon Session 2023: भिडेंवरील कारवाईसाठी विरोधक आक्रमक; सभागृहात खडाजंगी

Pavsali Adhiveshan 2023: राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशन शेवटचा आठवड्यात आज संभाजी भिडेंच्या मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाला. काँग्रेस आमदारांनी संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली.
Monsoon Assembly
Monsoon AssemblyAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Monsoon Session 2023 : राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणारे संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसने बुधवारी (ता. २) दोन्ही सभागृहांत आज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. कोणीही असले तरी राष्ट्रपुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान खपवून घेणार नाही, त्यांच्यावर कारवाई होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

दरम्यान, राष्ट्रपित्यांच्या विरोधात वक्तव्ये करणाऱ्या मनोहर कुलकर्णी नावाच्या व्यक्तीचा भिडे गुरुजी असा उल्लेख करण्यावर काँग्रेसने कडाडून आक्षेप घेतला. त्यावर ते हिंदुत्वाचे काम करतात. ते आम्हाला गुरुजी वाटतात असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.

Monsoon Assembly
Maharashtra Assembly Live: सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन

काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्याबाबत बोलताना ‘हा व्यक्ती फ्रॉड आहे. पीएचडी असल्याचे सांगून बहुजन समाजाच्या मुलांची दिशाभूल करतो. ऐन परीक्षांच्या काळात मोहिमा काढतो. हा कुठला गुरुजी?’ असा सवाल केला.

तर भिडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधक आणि सत्ताधारी आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाली. पृथ्वीराज चव्हाण आणि सुधीर मुनगंटीवार तसेच काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि भाजपच्या राम सातपुते यांच्यात वादावादी झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले.

Monsoon Assembly
Crop Insurance: मध्य प्रदेश, छत्तीसगड, मनिपूरला पीक विमा भरण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

विधिमंडळातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडण्याची परवानगी मागितली. त्याचबरोबर यशोमती ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण यांनीही या विषयावर चर्चेची परवानगी मागितली. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तांत्रिक मुद्यावर चर्चा नाकारली. त्यामुळे काँग्रेसचे नेते आक्रमक झाले. यशोमती ठाकूर म्हणाल्या, की मनोहर कुलकर्णी नावाच्या माणसाला भिडे गुरुजी म्हटले जाते. त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केली, पण आम्ही ती सहन करणार नाही. मी विरोध केला तर मला कोथळा बाहेर काढण्याच्या धमक्या आल्या. मी धारकरी आहे, नरेंद्र दाभोलकर यांना मारले, तसेच तुम्हालाही मारण्यात येईल, अशी धमकी कैलाश सूर्यवंशी नावाच्या माणसाने आपल्याला दिल्याचे त्या म्हणाल्या. आपल्यालाही धमकीचे फोन आल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनाही धमकी मिळालेली आहे. ‘संभाजी भिडे हा बोगस माणूस आहे. त्यांची डिग्री कोणती,’ असा सवाल चव्हाण यांनी केला.

या चर्चेवर निवेदन करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की कोणालाही राष्ट्रपुरुषांच्या विरोधात वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. महापुरुषांबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचा अधिकार संभाजी भिडे यांनाही दिलेला नाही. पण ते छत्रपती शिवाजी महाराजांशी व त्यांच्या किल्ल्यांशी बहुजनांना जोडण्याचे काम करतात.

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्यांना अटक करण्यात येईल, तसेच त्यांना पोलिस संरक्षण देण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com