Crop Insurance: मध्य प्रदेश, छत्तीसगड, मनिपूरला पीक विमा भरण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Crop Insurance Scheme : महाराष्ट्राला केवळ ३ दिवसांची मुदतवाढ; उत्तर प्रदेश आणि राजस्थानला १० ऑगस्टपर्यंत मुदत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Application of Crop Insurance Scheme : नवी दिल्लीः पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी केंद्राने ३१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. पण अनेक राज्यांमध्ये अर्ज भरण्यात अडचणी आल्या. त्यामुळे राज्यांनी अर्ज भरण्यात मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. केंद्राने मध्य प्रदेश, छत्तीसड, मनिपूर आणि गोव्याला १५ ते १६ दिवसांची मुदतवाढ दिली. तर महाराष्ट्राला केवळ ३ दिवसांची मुदतवाढ दिली होती. मात्र हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी या राज्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली. केंद्राच्या या भुमिकेवरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

केंद्र सरकारने मंगळवारी काही राज्यांना पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यात मुदतवाढ दिली. कारण ३१ जुलैपर्यंत मुदत असताना शेवटच्या आठवड्यात देशाच्या विविध भागात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना अर्ज भरता आले नाही. यामुळे अनेक राज्यांनी केंद्राकडे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. पण केंद्राने सरसकट सर्वांना मुदतवाढ न देता काही राज्यांना मुदतवाढ दिली तर काही राज्यांना मुदतवाढ नाकारली.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविमा भरण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्या

अशी मिळाली मुदतवाढ
केंद्राने पीक विमा योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. पण अनेक राज्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय कृषी मंत्रालयाने मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि मनिपूर या राज्यांना ३१ जुलैनंतरही १५ ते १६ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. उत्तर प्रदेश आणि राजस्थानला १० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. तर आसाम आणि ओडिशाला ५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. महाराष्ट्राला तीन दिवसांची मुदत दिली. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. तर कर्नाटकला केवळ एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती.

या राज्यांना नाकारली मुदतवाढ
हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, उत्तराखंड आणि पुद्दुचेरी या राज्यांना मुदतवाढ नाकारण्यात आली. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या राज्यांमध्ये अंतिम मुदत १५ जुलै होती. पण केंद्राने आधीच या राज्यांना १५ दिवसांची मुदतवाढ देऊन ३१ जुलै केली होती. त्यामुळे या राज्यांना आता पीक विमा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com