Maharashtra Assembly
Maharashtra Assembly Agrowon

Maharashtra Assembly Live: सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन

राज्यातील काही भागात अतिवृष्टि झाली आहे. अनेक भागात पूरस्थिति निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
Published on

राज्यातील काही भागात अतिवृष्टि झाली आहे. अनेक भागात पूरस्थिति निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटले. शेतकऱ्यांना तातडीनं राज्य सरकारनं सरसकट मदत करावी, अशी मागणी विरोधीपक्षानं केली आहे.

विरोधकांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर निवेदन काढण्याचं आश्वासन दिलं. अजित पवार म्हणाले, "आजचं कामकाज संपण्याच्या आधी नुकसानीबद्दल निवेदन काढू. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे."

Maharashtra Assembly
Maharashtra Monsoon Session LIVE: सरकारचा एक दिवस बळीराजासाठी, बाकीचे दिवस आमदार फोडण्यासाठी ; बाळासाहेब थोरातांचा सरकारवर हल्लाबोल

विदर्भात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पेरणी केलेली पिकं खरडून गेली आहेत. घरात पाणी शिरलं आहे. तर अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जनावर वाहून गेली आहेत.

नाना पटोले यांनी सरकारच्या मदतीच्या घोषणा कोरड्याच असल्याची टीका केली. पटोले म्हणाले, "विदर्भातील शेतकऱ्यांचं पुरानं नुकसान झालं आहे. सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत करावी. सरकार घोषणा करतं पण मदत मिळत नाही. त्यामुळे तातडीनं मदत करावी," अशी मागणी केली.

पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू झाला आहे. कामकाजाच्या सुरुवातीला डॉ. संजय कुटे यांनी राज्यातील पूरस्थितीचं गांभीर्य सभागृहासमोर मांडलं. त्यावर नाना पटोले, विजय वडट्टीवार, सुनिल केदार, अनिल देशमुख, भास्कर जाधव यांनी सरकारला धारेवर धरत तातडीनं मदत करण्याची मागणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com