Army Vacancy : सैन्यदलात व्हा अधिकारी

अभियांत्रिकीची पदवी असलेल्या तरुणांना भारतीय सैन्यदलामध्ये अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांसाठी एक अनोखी संधी मिळणार आहे.
Army Vacany
Army VacanyAgrowon

पुणे ः अभियांत्रिकीची पदवी असलेल्या तरुणांना भारतीय सैन्यदलामध्ये अधिकारी (Army Officer) म्हणून काम करणाऱ्यांसाठी एक अनोखी संधी मिळणार आहे. सैन्यदलाद्वारे ‘टेक्निकल ग्रॅज्युएट कोअर्स’च्या (टीजीसी-१३७) प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करणार आहे. तसेच या प्रवेशप्रक्रियेसाठी सुधारित तारखा जाहीर केल्या असून, येत्या बुधवारपासून (ता. १६) उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

Army Vacany
Rural Employment : शेतीपूरक उद्योगांना गावपातळीवर चालना देणारी संस्था !

सैन्यदलाने नव्या तारखा जाहीर केल्या असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १६ नोव्हेंबरपासून दुपारी ३ नंतर सुरू होणार आहे. दरवर्षी दोन वेळा टीजीएस प्रवेश प्रक्रिया पार पडते. टीजीएसच्या १३७ व्या अभ्यासक्रमासाठी ही प्रक्रिया असून, जुलै २०२३ पासून अभ्यासक्रमाची सुरुवात होणार आहे.

Army Vacany
Employment Guarantee Scheme : रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहरींची कामे

या प्रक्रियेअंतर्गत अभियांत्रिकीची पदवी किंवा अभियांत्रिकी पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेल्या केवळ पुरुष उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे. यासाठी लेखी परीक्षा न घेता सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखतींद्वारे (एसएसबी) उमेदवारांना निवडले जाईल. तर २७ वर्षांपर्यंत वयोमर्यादा ठेवली असून, ४० पदे रिक्त ठेवली आहेत. पदवीतील गुणवत्तेच्या आधारावर एसएसबीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असून यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

अधिक माहितीसाठी

या प्रक्रियेशी निगडित अधिक माहिती आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी www.joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. उमेदवारांना १५ डिसेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे, असे सैन्यदलाने सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com