भारतासारख्या शेतीप्रधान (Indian Agriculture) देशाची अर्थव्यवस्था ग्रामीण भागावरच अवलंबून आहे, ही बाब महात्मा गांधी (Mahtma Gandhi) यांनी अचूक हेरली होती. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम (Wardha Sevagram) येथे वास्तव्यास असताना त्यांनी ग्रामीण रोजगारावर (Rural Employment) लक्ष केंद्रित केले. शेतीपूरक उद्योगांना गावपातळीवर चालना मिळावी, असा त्यांचा विचार होता. त्यांनी ग्रामोद्योगाची चळवळ रुजविणारे डॉ. जे. सी. कुमारअप्पा (Dr. J. C. KumarAppa) यांच्या मदतीने मगन संग्रहालयाच्या माध्यमातून हा विचार पुढे नेला.
मगनलाल हे गांधीजींचे पुतणे. त्यांच्या देखरेखीत संस्थेचे काम सुरू होते. त्यामुळे पुढे त्याचे नामकरण मगन संग्रहालय असे झाले. गांधींजींचे खंदे समर्थक देवेंद्र कुमार यांच्याकडे नंतर संस्थेची धुरा आली. त्यांच्या नंतर त्यांची मुलगी डॉ. विभा गुप्ता या मगन संग्रहालयाचे व्यवस्थापन सांभाळतात. बांबू, मध संकलन, हस्तकागद, मातीच्या घरांची निर्मिती अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण रोजगारनिर्मितीची विचार रुजविण्यात मगन संग्रहालय यशस्वी झाले आहे.
कापूस ते कापड संकल्पना
गांधीजींनी चरख्यावर सूतकताईची चळवळ रुजवली. त्यापासून पुढे खादीचे कापड तयार केले. आजही मगन संग्रहालयात चरख्यावर सूतकताई करून त्यापासून तयार झालेल्या धाग्याचे हातमागावर कापड तयार केले जाते. विधवा, परित्यक्ता महिलांसोबतच इतर गरजू लोकांना रोजगार देण्यावर संस्थेचा कटाक्ष असतो. महिलांना महिन्याला सरासरी चार ते पाच हजार रुपये मिळतात. एक किलो सूतकताई केल्यास २७० रुपये प्रति किलो प्रमाणे पैसे मिळतात. एका दिवसाला (आठ तासांत) एक किलो सूतकताई होते. खादी विभागात हात व सोलरचलित चरखे आहेत. इथे तब्बल दोनशे व्यक्तींच्या रोजगाराची सोय आहे...
अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.
अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -
अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.