Rain Update : जून महिन्यात राज्यात अवघा ५४ टक्के पाऊस

Latest Rain News : पूर्वमोसमी पावसाची दडी, मॉन्सूनचे लांबलेले आगमन यामुळे यंदाच्या जूनमध्ये राज्यात ११३.४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ५४ टक्के पाऊस पडला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Pune Rain News : पूर्वमोसमी पावसाची दडी, मॉन्सूनचे लांबलेले आगमन यामुळे यंदाच्या जूनमध्ये राज्यात ११३.४ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या अवघा ५४ टक्के पाऊस पडला आहे. मराठवाड्यात पावसाची दडी असल्याने केवळ ३१ टक्के पाऊस पडला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही पावसाची तूट राहिली आहे. महिन्याअखेरीस झालेल्या पावसाने काहीशी तूट भरून आली आहे. आता या महिन्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

जूनमध्ये राज्यात सरासरी २०९.८ मिलिमीटर पाऊस पडतो. मॉन्सूनचे आगमन खुपच लांबले. यातच पूर्व मोसमी पावसाने दडी दिल्याने जून महिन्यात पावसाने अपेक्षित जोर धरलेला नाही. विशेष म्हणजे राज्याच्या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. महिनाअखेरीस कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या, तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. जूनच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत विदर्भासह राज्याच्या काही भागात उष्ण लाट अनुभवायला मिळाली.

Rain Update
Rain Update : पश्‍चिम महाराष्ट्रातील धरणक्षेत्रांत पाऊस वाढला

चक्रीवादळाने बाष्प पळवले

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) आगमन यंदा लांबले. केरळमध्ये दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या सात दिवस उशिराने (८ जून) मॉन्सून दाखल झाला. तोच अरबी समुद्रात ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाची निर्मिती झाली.

या वादळाने काही काळ मॉन्सून खेचून घेतल्याने पश्चिम किनारपट्टीवर वेगाने प्रगती होत ११ जून रोजी मॉन्सून तळ कोकणात दाखल झाला. चक्रीवादळाची तीव्रता वाढत गेली आणि मॉन्सूनची वाटचाल थांबली. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्यास १२ दिवसांची वाट पाहावी लागली.

यातच चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने राज्यात पूर्व मोसमी पावसाने देखील ओढ दिली. वादळ निवळल्यानंतर बंगालच्या उपसागरावरील प्रवाह वेगवान होत पूर्व भारतात वाऱ्यांची आगेकूच सुरू झाली. २३ जून रोजी विदर्भात मॉन्सूनला चाल मिळाली, तर २५ जून रोजी मॉन्सूनने विक्रमी मजल घेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.

अरबी समुद्रातील चक्रीवादळ, बंगालच्या उपसागरात दोन कमी दाब प्रणाली तयार झाल्या या प्रणालींचा मॉन्सूनच्या वाटचालीवर प्रभाव पडला. २५ जूननंतर अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला. विदर्भातही पाऊस झाला. मात्र उर्वरित राज्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली नाही.

मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस

विभागनिहाय स्थितीत मराठवाडा विभागात सरासरीच्या तुलनेत खूपच कमी पाऊस पडला आहे. विभागाच्या पावसात ६९ टक्क्यांची तूट दिसून येत आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ५१ टक्के तूट, विदर्भ विभागात ४९ टक्के आणि कोकण-गोवा विभागाच्या पावसात २८ टक्क्यांची तूट असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.

Rain Update
Monsoon 2023: माॅन्सून वाट अडखळलेलीच, राज्याच्या या भागांमध्ये आज पावसाचा अंदाज

जून अखेरपर्यंत राज्यातील विभागनिहाय पाऊस

विभाग---सरासरी---पडलेला---टक्केवारी

कोकण, गोवा---७०१.५---५०२.९---उणे २८

मध्य महाराष्ट्र---१५७.७---७७.४---उणे ५१

मराठवाडा---१३४.७---४१.३---उणे ६९

विदर्भ---१७५.४---९०.०---उणे ४९

पालघरमध्ये सर्वाधिक, हिंगोलीत सर्वांत कमी

संपूर्ण जून महिना पावसाने दडी दिल्याने राज्यात बहुतांश जिल्ह्यात खूपच कमी पाऊस झाला आहे. महिन्याच्या अखेरीस पावसासाठी पोषक हवामान झाल्याने कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाने जोर धरला. त्यामुळे या भागात पावसाची तूट कशीबशी भरून निघाली आहे. जूनअखेर पालघर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. तर

विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत सरासरी इतका पाऊस झाला आहे. ठाणे, मुंबई शहर, नंदूरबार जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात जूनमध्ये खुपच कमी पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने पावसात सरासरीच्या तुलनेत ९६ टक्क्यांची तूट आहे.

Rain Update
Gujrat Rain : मुसळधार पावसाने गुजरातचे हाल बेहाल ; २४ तासांत ९ इंच पाऊस

राज्यातील जिल्हानिहाय पावसाचे प्रमाण (तफावत टक्क्यांत) :

सरासरीपेक्षा अधिक (२० ते ५९ टक्के अधिक) :

पालघर.

सरासरी इतका (उणे १९ ते १९ टक्के अधिक) :

ठाणे, मुंबई, नंदूरबार, भंडारा, गोंदिया.

सरासरीपेक्षा कमी (उणे २० ते उणे ५९ टक्के) :

रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, धुळे, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली.

सरासरीच्या तुलनेत अपुरा (६० टक्क्यांपेक्षा कमी) :

जळगाव, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, जालना, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा.

जून अखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची स्थिती (सरासरीच्या तुलनेत तफावत)

जिल्हा---सरासरी---पडलेला---तफावत

मुंबई शहर---५४२.३---३४९.४---उणे ४६

पालघर---४१५.१---५३३.३---अधिक२८

रायगड---६५७.९---५१५.२---उणे २२

रत्नागिरी---८४०.२---४३०.३---उणे ४९

सिंधुदुर्ग---८९७.०---४९०.२---उणे ४५

मुंबई उपनगर---५३७.१---५४९.२---अधिक २

ठाणे---४६०.१---४७२.६---अधिक ३

नगर---११०.८---६८.१---उणे ३९

धुळे---१२०.९---५७.२---उणे ५३

जळगाव---११९.१---४०.२---उणे ६६

कोल्हापूर---३८०.८---१५७.८---उणे ५९

नंदूरबार---१५५.६---१४०.२---उणे १०

नाशिक---१६६.०---१००.३--- उणे ४०

पुणे---१८६.८---११२.६---उणे ४०

सांगली---१२४.१---२४.५---उणे ८०

सातारा---१९२.५---८१.८---उणे ५७

सोलापूर---१००.८---२६.७---उणे ७३

छ.संभाजीनगर---१२१.२---५३.४---उणे ५६

बीड---१२४.८---४३.९---उणे ६५

हिंगोली---१७०.७---६.०---उणे ९६

जालना---१२९.६---१९.८---उणे ८५

लातूर---१३४.७---८३.४---उणे ३८

नांदेड---१५२.५---२८.८---उणे ८१

धाराशीव---१२०.७---१९.१---उणे ८४

परभणी---१३८.९--६९.२---उणे ५०

अकोला---१४३.६---२७.९---उणे ८१

अमरावती---१४९.६---५७.६---उणे ६१

भंडारा---१८७.४---२१४.४---अधिक १४

बुलडाणा---१३५.९---३३.९---उणे ७५

चंद्रपूर---१८८.५---८२.०---उणे ५७

गडचिरोली---२२०.१---१३०.१---उणे ४१

गोंदिया---१९६.५---२१८.५---अधिक ११

नागपूर---१७३.९---१२१.३---उणे ३१

वर्धा---१७०.२---६५.९---उणे ६१

वाशीम---१७४.७---५८.६---उणे ६६

यवतमाळ---१७३.०---६१.६---उणे ६४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com