Gujrat Rain : मुसळधार पावसाने गुजरातचे हाल बेहाल ; २४ तासांत ९ इंच पाऊस

Latest Rain Update Gujrat : गेल्या दोन दिवसांमध्ये गुजरातमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घाताला आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक भागातील नागरी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Gujrat Rain
Gujrat RainAgrowon

Heavy Rain Gujrat : गेल्या दोन दिवसांमध्ये गुजरातमध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घाताला आहे. मुसळधार पावसामुळे गुजरातमधील अनेक भागातील नागरी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाच्या हाहाकारामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अजूनही पावसाचा जोर सुरूच असून गेल्या ३० तासांत काही भागात २०० मिलीमीटरहून (मिमी) अधिक पावसाची नोंद झाली आहे.

गुजरातमधील जुनागड, जामनगर, मोरबी, कच्छ, सुरत आणि तापीसह विविध जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जिल्ह्यांमधील अनेक शहरांमध्ये पावासामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. याशिवाय ग्रामीण भागालाही पावसाचा मोठा फटका बसला असून अनेक रस्ते बंद झाले आहेत.

Gujrat Rain
Monsoon Rain : जुलैमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत

गुजरातच्या राज्य आप्तकालीन केंद्राच्या आकडेवारीनुसार, गुजरातमधील ३७ तालुक्यांमध्ये शुक्रवार दुपारी दोन वाजेपर्यंतच्या ३० तासांच्या कालावधित १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. तापी जिल्ह्यातील व्यारा तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला असून येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. व्यारा तालुक्यामध्ये सुमारे २९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सध्या गुजरातमधील सर्व ३३ जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपत्ती व्यस्थापनासंदर्भात बैठक घेतली आहे. पावसाचा संभावित धोका पाहता एनडीआरफच्या पथके तैनाात करण्याचे करण्यात आली आहे.

Gujrat Rain
Monsoon Update : कुठे दडला मॉन्सूनचा पाऊस?

दरम्यान, गुजरातमधील सात जिल्ह्यांमध्ये २०० हून अधिक मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जूनागड शहर (२९८मिमी), तापी येथील वालोद तालुका (२८८मिमी), सुरत येथील महुआ (२५६ मिमी), जामनगर शहर (२३६ मिमी), सुरत येथील बारडोली (२२३ मिमी) समावेश आहे.

याशिवाय जूनागड (२०७ मिमी) आणि तापी जिल्ह्यातील डोलवनमध्ये (२०६ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. जामनगर जिल्ह्यातल्या जामनगर तालुत्यात सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधित तब्बल १७७ मिमी पाऊस पडला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाच्या (आयएमडी) अंदाजानुसार, आज गुजरातमधील विविध जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार शनिवारी गांधीनगर, खेडा, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, नवसारी आणि वसलाड या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या दोन दिवशीही राज्यातील वेगवेगळ्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com