Onion Market महाळुंगे पडवळ, जि. पुणे : आंबेगाव तालुक्यात कांदा लागवड अंतिम टप्यात आली आहे. जवळपास दहा हजार एकर क्षेत्रावर कांदा लागवड झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
आंबेगाव तालुका हा कांदा उत्पादनात अग्रेसर तालुका म्हणून ओळखला जातो. या वर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे.
तसेच गावागावांतील पाझर तलावातही चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले होते.
परंतु ढगाळ हवामान व धुक्यामुळे कांदा पिकावर करपा, भुरी, मुळकूज आदी कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.
त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड थांबविली होती. पुन्हा कांदा लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली असून आता कांदा लागवड अंतिम टप्यात आली आहे.
जवळपास चार हजार २०३ हेक्टर क्षेत्रांत कांदा लागवड झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी चार ते पाच टक्क्यांनी कांदा लागवड क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज कृषी कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
ऑक्टोबर महिन्यापर्यंत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा सर्वाधिक फटका कांदा रोपांना बसला. तर शेतात पाणी साचल्याने काही शेतकऱ्याना कांदा रोपे टाकता आली नाही. तसेच बदललेल्या वातावरणाचाही फटका बसला. त्यामुळे उशिराने कांदा लागवड करावी लागली.
- नवनाथ काळे, शेतकरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.